विविध राजकिय पक्षांच्या सशक्तीकरणासाठी नेत्यांचे, नारीशक्तीला घालण्यात येणार साकडे.
कारंजा (लाड) : भारतिय संस्कृतीमध्ये नारीशक्तीला जगत्जननी आदिशक्ती म्हणून संबोधन्याची परंपरा असून,कारंजा मतदार संघाच्या पहिल्या आमदार म्हणून मायमाऊली श्रीमती सईताई डहाके,कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती महिला श्रीमती सईताई डहाके,देशातील सर्वात मोठ्या सत्ताधारी भाजपा पक्षाच्या शहर अध्यक्षा सौ.प्राजक्ताताई माहितकर असल्यामुळे,सद्यस्थितीत कारंजा तालुक्यात 'महिला राज' अस्तित्वात आहे.शिवाय जिल्हा परिषद वाशिमचे 'अध्यक्षपद' आणि कारंजा नगर पालिकेच्या 'अध्यक्षपदाच्या' आरक्षणानुसार,स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 'मिनी-मंत्रालयात' आणि कारंजा 'नगर पालिकेतही' लवकरच 'महिला-राज' अस्तित्वात येवू घातलेले आहे. त्यामुळे एकीकडे कारंजा तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण वाशीम जिल्ह्यातील पुरुषांची 'अडचण' झाली आहे.तर दुसरीकडे महिलांमध्ये 'आनंदोत्साहाला' उधान आले असल्याचे सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी सांगीतले आहे.परंतु असे असले तरी 'महिलांच्या' कारभाराने महिलांचे 'सशक्तिकरण' होऊन जिल्ह्याचा आणि 'कारंजा - शहराचा' विकास होईल का ? महिलांना स्वतंत्र कारभार करून विकासाभिमुख निर्णय घेता येतील का ? की महिलांच्या आडून राजकिय पक्षांचे 'वजनदार' नेतेच पडद्याआडचे 'राजकारण' करून स्थानिक स्वराज्य संस्थावर आपले 'वर्चस्व' कायम ठेवतील.हे पहावे लागणार असल्याचेही पत्रकार संजय कडोळे यांनी म्हटले आहे. 'आरक्षण' जाहिर होताच विविध 'राजकिय पक्ष' आणि गट-तट-पॅनलच्या हालचाली वाढलेल्या असून,स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेण्यासाठी निवडक पक्षांनी, महिला उमेद्वारांची 'शोध मोहिमही' सुरू केल्याचे दिसून येत आहे.असे वृत्त ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी कळवीले आहे.