मानोरा : मानोरा तालुक्यातील ग्राम रुई येथे मोदी आवास योजने अंतर्गत ओबीसी घरकुल योजना सुरू असून ग्रामपंचायतचे सरपंच आणि ग्राम सचिव यांच्या मनमानी कारभारामुळे योग्य व गरजू लाभार्थ्यांना वगळून सरपंच आणि सचिव यांनी संगनमताने स्वतःच्या नातलगांना आणि त्यांच्या जवळच्या व्यक्तींना घरकुल योजनेमध्ये समाविष्ट केले, आर्थिक परिस्थिती पाहता ज्यांना घरकुल योजनेची नितांत गरज आहे ते लाभार्थी मात्र घरकुल योजनेपासून वंचित राहत आहे, त्यामुळे सरपंच हा गावाचा प्रथम नागरिक आहे आणि मानल्या जातो म्हणून त्यांनी गावात असा भेदभाव करणे योग्य नाही ही गावकऱ्यांकडून संतप्त भूमिका व्यक्त होत आहे . त्यामुळे आपण या पुढे असे कुठलेही प्रकरण तुमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून घडून आल्यास आम्ही योग्य ते पाऊल उचलून कारवाई करण्याची मागणी करू. असी समज अन्यायग्रस्त नागरीकांनी त्यांना दिली असल्याचे वृत्त प्राप्त झाले आहे.