कारंजा : चैत्र शुद्ध पोर्णिमा, शनिवार दि .१७ एप्रिल रोजी, कारंजा शहरातील शेकडो . श्री हनुमान मंदिरमध्ये , मोठया आनंदोत्साहात श्री हनुमान जन्मोत्सव साजरा कारण्यात आली.
अनेक ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन सुद्धा करण्यात आले . यानिमित्ताने सर्व मंदिराची रंगरंगोटी करण्यात आली असून मंदिरांवर रोषनाई करण्यात आली .प्रातःकाळी सर्वच श्रीहनुमान मंदिरावर अभिषेक, श्री हनुमान चालीसा व महाआरती करण्यात आली. व महाप्रसाद वितरण करण्यात आले आहे . श्री जुळवा हनुमान, वाल्हई फाटा कारंजा व कारंजातील सर्वात प्राचिन संकटमोचन श्री हनुमान मंदिर भिलखेडा, श्री खोलेश्वर हनुमान मंदिर, शिवायन नमः मठ संस्थान येथे श्रींची यात्रा भरणार आहे . तसेच शहरातील शिवाजी पुतळा, टिळक चौक, शिवाजी नगर, बजरंगपेठ, माळीपूरा, महाराणा प्रताप नगर , रामासावजी चौक, जिजामाता चौक इत्यादी शेकडो मंदिरावर महाप्रसाद भजन किर्तन कार्यक्रम करण्यात आले. जय भवानी जय मल्हार वारकरी मंडळ दिंडी प्रमुख संजय कडोळे यानी महिती दिली.