दिपावलीच्या धुमधडाक्यानंतर,कार्तिक शु 12 शुक्रवार दि. 24 नोहेंबर 2023 ते कार्तिक शुद्ध पोर्णिमा सोमवार दि.27 नोहेंबर 2023 पर्यंत तुळशी-माधव विवाह पार पडणार असून त्या पाठोपाठ लगेचच हिंदु धर्म संस्कृती मधील शुभ विवाह मुर्हूताला प्रारंभ होणार असून, यंदा पुढील शुभ मुहूर्त असून यंदा कर्तव्य असणाऱ्या विवाहोच्छुकांच्या आनंदपर्वणीला योग्य मुहूर्त मिळणार आहेत.असे जय भवानी जय मल्हार गोंधळी कला संच कारंजाचे महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त गोंधळी लोककलावंत संजय मधुकरराव कडोळे ( मो.न.9075635338) यांनी कळवीले असून सन 2023 मध्ये नोहेंबर महिन्यात दि. 27 ; 28 ; 29 नोहेंबर, डिसेंबर महिन्यात दि. 6 ; 7 ; 8 ; 15 ; 17 ; 20 ; 21 ; 25 ; 26 ; 31 डिसेंबर,सन 2024 मध्ये जानेवारी महिन्यात दि. 2 ; 3 ; 4 ; 5 ; 6; 8 जानेवारी ; फेब्रुवारी महिन्यात दि. 12 ; 13 ; 17 ; 18 ; 24 ; 26 ; 27 ; 28 ; 29 फेब्रुवारी, मार्च महिन्यात दि. 3 ; 4 ; 6; 16 ; 17 ; 26 ; 27 ; 30 मार्च, एप्रिल महिन्यात दि.1 ; 3 ; 4 ; 5 ; 18 ; 20 ; 21 ; 22 ; 26 ; 28 एप्रिल, मे महिन्यात दि. 1 ; 2 मे, जून महिन्यात दि.29 ; 30 जून, जुलै महिन्यात दि. 11 ; 12 ; 13 ; 14 ; 15 जुलै. इत्यादी शुभ मुहूर्त आहेत.सदर मुहूर्तावरील शुभ घटिकांचा विवाहोच्छुक जोडप्यांना दाम्पत्य जीवनामध्ये योग्य लाभ मिळावा ह्याकरीता मुहूर्ताच्या अचूक वेळेवर विवाह पार पडणे अत्यावश्यक असते. त्यामुळे याची दक्षता घेऊन,आपल्या हिंदु धर्म संस्कृती नुसार कुळाचाराप्रमाणे विवाह पार पाडले पाहीजेत.असे वृत्त प्रसिद्धी पत्रकामधून जय भवानी जय मल्हार गोंधळी कला संच कारंजाचे महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त गोंधळी लोककलावंत संजय कडोळे (मो.नं. 9075635338) यांनी कळवीले आहे.