दिनांक 8 फेब्रुवारी 2024 रोजी पुणे येथे पार पडलेल्या राज्य निर्यात पुरस्कार सोहळ्यात अकोला जिल्ह्यातील नामांकित फार्मास्युटिकल उत्पादक कंपनी लेबेन लॅबोरेटरीज प्रा. लि. यांना माननीय उद्योग मंत्री श्री उदय सामंत यांच्या हस्ते सन 2018-19 व 2019-20 या वर्षाकरिताचा राज्य निर्यात स्वर्ण पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या या यशाबद्दल माननीय जिल्हाधिकारी अकोला यांच्या हस्ते श्री. भरत शाह, कार्यकारी संचालक, श्री पार्थ शाह, तांत्रिक संचालक, लेबेन लॅबोरेटरीज प्रा. लि. अकोला यांचा आज जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे सत्कार करण्यात आला. तसेच जिल्हाधिकारी यांनी लेबेन लॅबोरेटरीज प्रा. लि. अकोला यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन अकोला जिल्ह्यात अधिकाधिक गुंतवणूक करण्याचे आवाहन केले.*