स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती तथा वाशिम जिल्हा परिषदेचे माजी सदस्य,तालुका काँग्रेस कमेटीचे माजी अध्यक्ष, कुंभार समाजाचे आदर्श लोकनेते स्व. केशवराव चंपतराव खोपे यांचे ,गुरुवार दि.16 नोहेंबर 2023 रोजी दिर्घ आजाराने निधन झाले असून त्यांच्या चौदावी निमित्त बुधवार दि.29 नोहेंबर 2023 रोजी स्थानिक शेतकरी निवास सभागृह कारंजा येथे सुप्रसिद्ध किर्तनकार हभप पंकज महाराज पवार आळंदीकर यांचे किर्तनाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. त्यावेळी आपल्या किर्तनातून स्व. केशवराव खोपे यांना आदरांजली वाहतांना हभप पंकज महाराज पवार आळंदीकर आपल्या हरिकिर्तना मधून म्हणाले की, लोकनेता स्व.केशवराव खोपे हे आपले जीवन जगत असतांना निव्वळ स्वतःसाठी किंवा कुटुंबासाठी जीवन न जगता ते आयुष्यभर समाजासाठी जगले. समाजासाठी जीवन वेचणारी व्यक्ती ही "आचंद्र दिवाकरौ" म्हणजे ब्रम्हांडात सुर्य चंद्र असे पर्यंत जीवंत म्हणजेच अमर राहते.त्यामुळे स्व.केशवराव खोपेहे आपल्या किर्तीने अमर झाले आहेत.हभप पंकज महाराज पवार यांच्या किर्तनाला ग्राम मुरंबी येथील वारकरी संप्रदाय मंडळाचे सर्व हभप गोपाल महाराज काकड,विजय महाराज (मृदंगाचार्य),अमोल महाराज,राम महाराज,वसंत महाराज काळे,पंडीत महाराज सुपलकर, एकनाथ महाराज भावनगरे,विठ्ठल महाराज भावनगरे,श्रीकृष्ण महाराज एकनार इत्यादी वारकरी मंडळीनी साथसंगत दिली.कार्यक्रमाला कारंजा तालुक्याच्या ग्रामीण भागातून आलेले स्व.केशवराव खोपे यांचे चाहते,कॉंग्रेस व सर्वपक्षीय कार्यकर्ते,सरपंच, ग्रामपंचायत सदस्य,शिक्षक वृंदाची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.कार्यक्रमाचे आयोजन खोपे यांचे भाऊ बाळासाहेब चंपतराव खोपे, गजानन चंपतराव खोपे, ज्येष्ठ चिरंजीव निलेश केशवराव खोपे, लहान चिरंजीव योगेश केशवराव खोपे,पत्नी श्रीमती लताबाई केशवराव खोपे व खोपे परिवाराकडून करण्यात आले होते.असे वृत्त प्रत्यक्षदर्शी स्व केशवराव खोपे मित्र मंडळ आणि करंजमहात्म्य परिवाराचे संजय कडोळे तथा माजी सरपंच प्रदिप वानखडे यांनी कळवीले आहे.