अकोला:- अकोला जिल्ह्यात सहकार क्षेत्रामध्ये अग्रगण्य असलेली संघीय संस्था अकोला जिल्हा मजूर कामगार सहकारी संस्थाचा संघ अकोल्याच्या अध्यक्षपदी निवडणुकीत शोभा नंदकिशोर पाटील यांची अविरोध निवड झाली आहे दरम्यान 23 जून रोजी पिठासीन अधिकारी अभय कुमार कटके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली असता अध्यक्ष पदाकरता एकच नामनिर्देशक पत्र प्राप्त झाल्यामुळे शोभानंदकिशोर पाटील यांची अध्यक्षपदी अविरोध निवड झाली असेच अभय कुमार कटके यांनी जाहीर केले या सभेला संचालक सचिन निळकंठ खारोडे अनिल माणिक फाटकर रोहित दिलीप सिंग ठाकूर मोहन दामोदर धूळ सोनाली अभिजीत ठाकरे स्मिता अरविंद शेंडे प्रद्युम्न प्रकाश गाडगे अब्दुल रशीद अब्दुल सत्तार विठ्ठल अशोक पाटील जानकीराम रागला राठोड रीना अन्नपूर्णेश पाटील मंगेश नंदकिशोर फाटकर प्रदीप किशन किशनराव शिरसाट गजानन मधुकर शिंदे उपस्थित होते उपस्थित नवनिर्वाचित अध्यक्ष व संचालकांचे संघाचे व्यवस्थापक अजय सावरकर व कैलास भाकरे यांनी स्वागत केले.