अकोला स्थानिक; दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोलाच्या लुईस ब्रेल वाचक व लेखनिक बँकेच्या मदतीने विदर्भात दिव्यांग विद्यार्थी विद्यापीठाच्या परीक्षा देत आहेत. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सत्र २०२२ च्या परीक्षा जून, जुलै या महिन्यात होऊ घातलेल्या आहेत. या सर्व परीक्षांमध्ये अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम व यवतमाळ या जिल्ह्यातील दिव्यांग विद्यार्थी मोठ्या संख्येने परीक्षेसाठी बसले आहेत. स्नातक व स्नातकोत्तर परीक्षा देण्यासाठी या दिव्यांग विद्यार्थ्यांना वाचक व लेखनिक आवश्यक असतो, सदर विषयात दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला द्वारा स्थापित लुईस ब्रेल वाचक व लेखनिक बँक ही दिव्यांग विद्यार्थ्यांना निशुल्क वाचक व लेखनिक पुरवत आहे. या वाचक व लेखनिक बँक च्या सदस्यांना प्रा. विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात अंध व दिव्यांग विद्यार्थ्यांची परीक्षा कशी पूर्ण करावी? त्यांचा पेपर कसा लिहावा? या विषयी कार्यशाळेतून मार्गदर्शन केले जात आहे. ह्या सत्रात माधव जोशी, अनामिका देशपांडे, साक्षी अग्रवाल, मुस्कान गुप्ता, श्वेता भिरड, समीक्षा मेहेसरे, दिव्या चव्हाण, आमना सय्यद जावेद अली, गौरी वांडे, सोहम पांडे, आकांक्षा गोमाशे, कृष्णा मालठनकर, दीक्षा गवई, , निखिल काकडे, या वाचक लेखनिक बँकेच्या सदस्यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी वाचक व लेखनिक म्हणून कार्य स्वीकारले आहे. समाजातील विविध सामाजिक संस्था, महिला वर्ग, महाविद्यालयीन विद्यार्थी, NSS, NCC चे स्वयंसेवक यांनी वाचक व लेखनिक म्हणून कार्य करावे असे आव्हान डॉ.संजय तिडके, प्रा.सोनल कामे, प्रा.अरविंद देव, प्रसाद झाडे, अंकुश काळमेघ, विशाल भोजने, यांनी केले आहे.