ब्रह्मपुरी येथील स्टेम पोदार लर्न स्कूलमध्ये गणराज्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, आमदार विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले.
याप्रसंगी डॉ. नितीन उराडे, सविताताई उराडे भास्करराव उराडे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमात इयत्ता ५वी च्या विद्यार्थ्यांनी समूहगीत व इयत्ता ४थी च्या विद्यार्थ्यांनी समूहनृत्य सादर केले. परिस परशुरामकर, प्रेक्षा कोहळे व श्रीनित अलोने यांनी गणराज्य दिनावर भाषण दिले.
याप्रसंगी राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, आमदार विजय वडेट्टीवार बोलतांना म्हणाले की, प्रजासत्ताक दिन सर्व भारतीयांमध्ये आनंद, उल्लास आणि नवीन विचारांना प्रेरणा देणारा असतो. नागरिक हक्क, सामाजिक जबाबदारी व घटनेने आपल्याला दिलेल्या अधिकारांची माहिती व जाणीव करून देणारा हा दिवस आहे. समाजाने, देशाने आपल्याला जे काही दिले त्याची परतफेड करण्याची जबाबदारीची भावना विद्यार्थ्यांच्या मनात असली पाहिजे. देशाच्या रक्षणासाठी, गौरवासाठी आणि उन्नतीसाठी सदैव समर्पित राहुन विद्यार्थ्यांनी देशासाठी आपले योगदान देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले.
स्कुलचे मुख्याध्यापक प्रवीण ढोले यांनी संविधान व त्याची पार्श्वभूमी, आपले कर्तव्य व अधिकार हे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. पीजेके हेडमिस्ट्रेस प्रीती काळबांडे यांनी विद्यार्थ्यांना गणराज्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका ममता राऊत व विद्यार्थिनी सात्विकी राऊत व निधी ढोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन विद्यार्थी चैतन्य गिरीपुंजे यांनी केले.
तुमच्या यशस्वी ते करिता प्रशासकीय अधिकारी सुमित चक्रवर्ती, वैशाली उराडे, मिथुन चौधरी, मेघा ढेंगरे, कोमल बुलबुले, उमेशकुमार राऊत, पल्लवी खेरे, रेशमा मासुरकर यांनी योगदान दिले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....