विदर्भातही जूनच्या पहिल्याच आठवड्यात पोहोचणार.
कारंजा (लाड) :
इ.सन १९८३ पासून,पत्रकारीतील निव्वळ निःस्वार्थ सेवा म्हणून, पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असलेले अभ्यासू,अनुभवी व ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे हे सातत्याने विविध विषयावर बातमीपत्र प्रसिद्ध करीत असतात.समाजातील नागरिकांना आरोग्यसेवेचे मार्गदर्शन मिळावे याकरीता चिकनगुनिया,डेंग्यु,कोरोना आजारावर,लोककलाक्षेत्रातील वयोवृद्ध,गरजू निराधार कलाकारांना न्याय मिळावा म्हणून,तसेच शेतकरी राजाला योग्य मार्गदर्शन देण्यासाठी, अनेकदा त्यांच्या बातमीपत्रामुळे मदतच झालेली आहे.सध्या गेल्या महिन्याभरापासून त्यांचे पावसाबाबतचे बातमीपत्रही खरे ठरत असून त्याची ग्रामस्थ, शेतकरी व समाजामध्ये विस्तृत चर्चा होत आहे.ग्रामस्थ व शेतकरी त्यांचेशी संपर्क साधत आहेत.
जिल्ह्यातील ग्राम रुई गोस्ता येथील हवामान अभ्यासक गोपाल गावंडे पाटील यांचेकडून मिळतात अचूक अंदाज.:-
वाशिम जिल्ह्यातील,मानोरा तालुक्याच्या ग्राम रुई गोस्ता येथील जिल्ह्याचे एकमेव हवामान अभ्यासक गोपाल विश्वनाथ गावंडे हे गेल्या तिन वर्षांपासून पत्रकार संजय कडोळे यांच्या संपर्कात आल्यामुळे ते एकमेकांशी भ्रमणध्वनिवर संवाद साधत असतात.आणि हवामान अभ्यासक गोपाल गावंडे यांच्या एका ओळीच्या छोट्याशा संदेशाद्वारे किंवा त्यांनी सांगितलेल्या मोजक्या चार पाच शब्दाच्या इशाऱ्या वरून बातमीपत्र तयार करून संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील लाखो शेतकरी आणि ग्रामस्थांपर्यंत पोहचवीत असतात.हवामान अभ्यासक गोपाल गावंडे यांचा अंदाज आणि ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांच्या लेखनीतून लिहिल्या गेलेले वार्तापत्र यामुळे लाखो शेतकरी राजाला योग्य मार्गदर्शन मिळत आहे.
अवकाळी पाऊस आणि मान्सूनच्या अनुमानाचे सर्व अंदाज ठरले खरे.:-
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे,विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष, महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषद वाशिमचे जिल्हाध्यक्ष हे सेवाव्रती कार्यामुळे त्यांना शेकडो पुरस्कारासह संत गाडगेबाबा स्वच्छतादूत हा राष्ट्रिय पुरस्कार आणि महाराष्ट्र राज्य सरकारचा, राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कारही मिळालेला आहे.ते साप्ताहिक करंजमहात्म्य ह्या प्रसिद्ध वृत्तपत्राचे संस्थापक संपादक असून, नामांकित दैनिक विश्वजगत,दैनिक विदर्भ कल्याण,युवाक्रांती समाचार इत्यादी वृत्तपत्रातूनही दररोज वार्तापत्र लेखन करीत असतात. गेल्या पंधरवाड्या पासून, हवामान अभ्यासक गोपाल विश्वनाथ गावंडे यांच्या हवामान इशाऱ्यावरून,पत्रकार संजय कडोळे यांनी व स्वतः गोपाल पाटील गावंडे यांनी वेळोवेळी वळवाच्या म्हणजे अवकाळी व पूर्वमोसमी पावसाबाबत व मान्सूनच्या अनुमानाबाबत साप्ताहिक करंजमहात्म्य,दैनिक विश्वजगत,दैनिक विदर्भ कल्याण,युवाक्रांती समाचार इत्यादीच्या माध्यमातून जनजागृती करून शेतकरी व ग्रामस्थांना सतर्क आणि जागृत केले. त्यामुळे कित्येक वेळा शेतकरी राजाच्या शेतमालाचे होणारे नुकसान टाळता आले आहे.त्याबाबत हजारो शेतकरी ग्रामस्थाकडून त्यांचे वेळोवेळी आभारही मानन्यात आले आहे. चालू वर्षी तर त्यांनी दिलेले अवकाळी पावसाचे आणि मान्सूनच्या आगमनाचे अंदाजही खरे ठरले आहेत. *जूनच्या पहिल्याच आठवड्यात मान्सून विदर्भात होणार दाखल.* यंदा साधारणतः एका आठवड्यापूर्वीच,मान्सूनचा पाऊस केरळमध्ये दाखल झालेला असून त्याने दमदार हजेरी लावली आहे.सध्या, बंगालच्या उपसागरापासून तर अरबी समुद्रापर्यंत कमी दाबाच्या हवेचा पट्टा तयार झाला असून, मोसमी वाऱ्याची वाटचाल योग्य दिशेने सुरू असल्यामुळे मान्सूनच्या चांगल्या प्रगतीचे सूचक आहे. सध्या रविवार दि २५ मे २०२५ रोजी रोहिणी लागल्या असून,रोहिणी नक्षत्रात, कोकण किनारपट्टी, मुंबई, पश्चिम महाराष्ट्रासह पूर्व पश्चिम विदर्भात रोहीणीचा पाऊसही दमदार होणार आहे.रोहिणीचा पाऊस शुभ मानला जातो.ज्या ज्या वेळी रोहिणीचा पाऊस येतो त्या वर्षी संपूर्ण पावसाळा चांगला होतो. असा जुन्या जाणत्या शेतकरी राजाचा तर्क आहे. या वर्षी तर रोहिणी नक्षत्रातच मान्सूनच्या पावसाला विदर्भात सुरुवात होण्याची संभावना आहे.
शेतकरी राजाने पेरणीसाठी मशागत करून घ्यावी.:-
यंदा लवकरच येत असलेल्या मान्सूनच्या आगमनाची वर्दी मिळाल्यामुळे शेतकरी राजाने चालू आठवड्यातच शेतीच्या मशागती कामे,काडी फणाची वेचणी,वखरणी करून पेरणीयोग्य जमिन तयार करून ठेवावी.मात्र चांगला भरपूर पाऊस झाल्या शिवाय शेतामध्ये पेरणी करू नये.राज्याच्या कृषी विभागाच्या सल्ल्यानेच पेरणी करावी.असे आवाहन हवामान अभ्यासक गोपाल गावंडे आणि ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी केले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....