गडचिरोली :: मागील काही दिवसात प्रचंड उष्णता वाढली असून वाढलेल्या उष्णतेने नागरिकांची प्रचंड होरपड होत आहे. वाढत्या उष्णतेसोबतच अनेक नागरिक उष्मलाटेच्या प्रभावात येण्याची शक्यता लक्ष्यात घेऊन जिल्हा सामान्य रुग्णालयातील उपायोजनांचा आढावा घेण्याच्या अनुषंगाने
गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येते भेटी दिली व उष्मघाताने एकाही नागरिकाचा जीव जायला नको या अनुषंगाने आवश्यक त्या उपाय योजना करण्याच्या सूचना खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी जिल्हा रुग्णालय प्रशासनाला केल्या. त्याचप्रमाणे इतरही आजारावर योग्य त्या वेळेते उपचार, रुग्णांना पुरेश्या औषधं उपचार देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
यावेळी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किलनाले, डॉ. सोलंकी, डॉ. मेश्राम सह शहर काँग्रेस अध्यक्ष सतीश विधाते, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, गौरव येनप्रेड्डीवार, विपुल येलट्टीवार, कुणाल ताजने उपस्थित होते.
खासदार डॉ. किरसान यांनी रुग्णालयातील अतिदक्षता विभागाची पाहणी करून रुग्णांशी व त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधले.