वाशिम : ढगाळ वातावरणामुळे सध्या सर्वत्र पाऊसाचा जोर असल्यामुळे, हवामान विभागाकडून संपूर्ण आठवडाभर सततधार पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केल्या जात आहे. त्यामुळे बाईक किंवा फोरव्हिलरच्या सर्वच वाहनधारकांनी वेगमर्यादेचे पालन करीत कमी वेगातच वाहने चालवावीत. आधीच आपल्या जिल्ह्यातील ग्रामीण भागातीलच नव्हे तर शहरातील रस्ते सुद्धा खड्डेमय झालेले आहेत. त्यात पावसाळा असल्याने रस्त्यावर पावसाचे पाणी असल्यास नेमका खड्डे कोठे, किती मोठा आहे ? याचा अंदाज वाहनधारकांना येत नाही. त्यामुळे सतर्क रहावे तसेच नदी,नाला यांचे पुल शिकस्त, अरुंद असू शकतात. एकदा गेलेला जीव परत मिळत नाही. त्यामुळे कोणतीही रिस्क घेण्याचे धाडस करू नये. आपला आणि सहकारी तसेच आपल्या कुटूंबाचे जीव अनमोल आहेत . त्यामुळे विनाकारणचे धाडस न करता सावधगीरी व सतर्कता बाळगावी. असे आवाहन महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामीण पत्रकार परिषद वाशिम तर्फे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी केले आहे.