वाशीम ::-
आपल्या वाशिम जिल्ह्यासह विदर्भात सध्या उष्णतेची तिव्र लाट आलेली असल्यामुळे अंगाची लाही लाही होत असून भर दुपारी वाशिम व जिल्हयातील सर्वच तालुक्यातिल रस्ते निमर्नुष्य होतांना दिसत आहेत . त्यामुळे उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणे जरूरी असल्यामुळे वाशिम जिल्हयातील सामाजिक कार्यकर्ते संजय कडोळे यांनी नागरिकांना उष्णतेपासून आपला बचाव करण्यासाठी पुढील प्रमाणे मार्गदर्शन केले आहे .
नागरिकांनी आपल्या शरीरातील पाणी वाढवले पाहीजे .- उष्णतेमुळे शरीरातील पाणी झपाट्याने कमी होते. म्हणून काळजी घ्या. नाहीतर उष्णतेचे अनेक विकार सुरू होतील.
उपाय-
१) नियमित प्राणायाम करा. उष्णतेचा त्रास केव्हाच होणार नाही.
२) अनुलोम विलोम जास्तच करा. शरीराचे तापमान स्थीर राहिल.
३) उजवी नाकपुडी बंद करून डावी नाकपुडी जास्तच वेळ चालू ठेवा. कारण ती चंद्रनाडी आहे. त्यामुळे शरीरात गारवा तयार होईल.
४) उजव्याच कुशीवर जास्तवेळ झोपा. त्यामुळे डावी नाकपुडी आपोआप जास्त वेळ चालू राहील.
५) हलकाच आहार घ्या. पोट साफ ठेवा. पित्त वाढवू नका.
६) माठातीलच थंड पाणी अगर कोमट पाणी बसून सावकाश चवीचवीने प्या. घटाघटा नाही.
७) पेयामध्ये अजिबातच बर्फ वापरू नका. बर्फ गरम आहे.
८) आवळा / कोकम / लिंबू / मठ्ठा / ताक इ. सरबत जरूर प्या.
९) सकाळी ऊठल्यावर लगेच १ ते २ ग्लास कोमट पाणी प्या.
१०) प्रत्येक काम सावकाशच करा.
११) जेवतेवेळी मधे मधे १/२ वेळा थोडे पाणी प्यावे.
१२) ऊन्हातून आल्यावर गुळ पाणी पिणे.
१३) खडीसाखर सोबतच ठेवून थोडी थोडी खाणे.
१४) जिरेपूड १ चमचा + खडीसाखर १ चमचा व १ ग्लास ताकातून रोज पिणे. उष्णता वाढणार नाही.
१५) दुपारच्या जेवणात रोज पांढरा कांदा जरूर खाणे.
१६) रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेल तळपायांना चोळणे व बेंबीत घालणे. तसेच देशी गाईचे तुप नाकात लावणे.
१७) उन्हापासून शरीराचे रक्षण करा. कॅप, छत्री, गाॅगल वापरा. आपल्याजवळ कापूरवडी व पांढरा कांदा ठेवून मधे मधे त्याचा वास घ्या . एवढे नियम जर आपण पाळले तर आपला बचाव आपणच करू शकतो असे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजय कडोळे यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात स्पष्ट केले आहे .
आपल्या प्रतिक्रिया द्या....