कारंजा:- स्थानिक झाशी राणी चौक कारंजा बायपास अश्विन पेट्रोल पंप समोर कारंजा यवतमाळ मार्गावर अकस्मात धावत्या मारुती व्हॅनला आग लागल्याची घटना दि. 06 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 : 30 च्या दरम्यान घडली.
प्राप्त माहिती नुसार कारंजा दारव्हा महामार्गावर पेट्रोलपंपा समोर मारुती व्हॅनला आग लागल्याची घटना घडली.सागर अंभोरे यांचेकडून घटनेची माहिती कारंजा नगर परिषद प्रशासनाला देण्यात आली.
कारंजा नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी तात्काळ माहिती अग्निशामक विभागाला देवून अग्निशामक दल घटनास्थळी रवाना केले. यावेळी कर्तव्यावर असणाऱ्या अग्निशमन जवानांनी घटनास्थळी जाऊन आगीवर नियंत्रण मिळविले.मात्र तोपर्यंत व्हॅन जळून खाक झाली होती.सदर्हु घटना,अश्विन पेट्रोल पंपा समोर घडल्याने खूप मोठा धोका निर्माण होऊ शकला असता.परंतु कारंजा नगर परिषद अग्निशामक दलाच्या तत्परतेने आगीवर लवकरच नियंत्रण मिळविले व पुढील अनर्थ टळला.यावेळी आग विझविताना कार्यरत असलेले चालक बाळू काटोये ,फायरमन शुभम झोपाटे, नरेंद्र भोयर,जायेजली यांनी व्हॅनची आग तात्काळ नियंत्रित केली.