कुणबी समाजाचे आराध्य संत, जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या स्मारकाचे अनावरण व कुणबी महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष प्रसंगी मा. खासदार प्रतिभाताई धानोरकर व आमदार सुभाष छोटे उपस्थित राहणार आहेत. त्यांनी स्वतःच समाज माध्यमांवर एक व्हिडिओ क्लिप प्रसारित करून या महाअधिवेशनात उपस्थित राहण्याचे वचन दिले आहे.
आपण सर्व समाज बांधवांनी या महाअधिवेशनात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, ही विनंती आहे. आपल्या उपस्थितीने या कार्यक्रमाची शोभा वाढेल आणि संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा प्रसार अधिक व्यापक होईल.
अखिल कुणबी समाज मंडळ, कुणबी समाज संघर्ष समिती, कुणबी महिला मंडळ, ब्रम्हपुरी.