मालेगाव/वाशिम : आपल्या अचूक हवामान अंदाजाने शेतकर्यांची संभाव्य नुकसानापासून सुटका करणारे,ज्यांच्या अंदाजावर अवलंबून शेतकरी आपल्या शेतातील कामे वेळेवर उरकून मोकळे होतात. अशाप्रकारचे हवामान अंदाज व्यक्त करून शेतकर्यांच्या हृदय स्थानी विराजीत असणारे,सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक, गोपाल विश्वनाथ गावंडे आपल्या कुटूंबीयांसह श्रीक्षेत्र नागरतास येथे जाणार असल्याची माहिती मिळताच,श्रीक्षेत्र नागरतास येथील शेतकरी बांधवानी एकत्र जमून,न भुतो न भविष्यती अशा आकस्मिकपणे श्रीजगदंबा मंदिरा मध्ये,मानोरा तालुक्यातील ग्राम रुई गोस्ता येथील हवामान अभ्यासक गोपाल गावंडे यांच्या सत्काराचे आयोजन केले.
यावेळी पूर्वनियोजीत कार्यक्रम नसतानाही, हवामानाचे अचूक अंदाज देणाऱ्या गोपाल गावंडे यांना बघायला,त्यांचेशी संवाद करायला पंचक्रोशीतील शेतकऱ्यांची फार मोठी गर्दी बघायला मिळाली.यावेळी सर्वप्रथम श्री भाग्यलक्ष्मी शेतकरी गट नागरतास तसेच श्री. जगदंबा देवी संस्थान नागरतास यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी महादेवराव,नारायण चव्हाण,सुभाषराव,पंकज पाटील, सुनील चव्हाण,निलेश देवळे, गोवर्धन देवळे,रामभाऊ देवळे, मालेगाव येथील उद्योजक ओमप्रकाश गट्टाणी यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून हवामान अभ्यासक गोपाल गावंडे यांचा सत्कार करुन त्यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या आणि आपण असेच अंदाज देऊन आम्हा शेतकरी वर्गाला आधार देण्याची विनंती केली. याप्रसंगी सत्काराला उत्तर देतांना हवामान गोपाल गावंडे यांनी कार्यक्रम आयोजक, जगाच्या पोशिंद्या सर्व शेतकऱ्यांचे, हात जोडून आभार मानले तसेच पावसाविषयी सर्वांशी चर्चा करतांना त्यांनी सांगीतले, "आई जगदंबा देवी नागरतास यांच्यावर विश्वास ठेवा. ह्या मायमाऊलीच्या कृपेने कोणत्याही शेतकर्याचे नुकसान होणार नाही.आपल्या भागात विदर्भात अल निनोच्या दुष्काळाची फारशी झळ जाणवणार नाही. सध्या चोहीकडे कुठे रिमझीम तर कुठे चांगला पाऊस सुरु असून,येत्या दि.23 सटेंबर 2023 पर्यत पाऊसमान चांगले होऊन सोयाबीन पिकाला निश्चितच त्याचा फायदा होऊन शेतकर्याचे सोयाबीन चांगलेच होईल." त्यानंतर हवामान अभ्यासक गोपाल गावंडे यांनी शेतकर्यांशी चर्चा सुद्धा केली.सर्व शेतकऱ्यांनी त्यांचे आभार मानले.असे वृत्त श्रीक्षेत्र नागरतास येथील शेतकरी वर्गाकडून महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेला मिळाले असल्याचे वृत्त अध्यक्ष संजय कडोळे यांनी कळविले आहे.