कोरपना तालुक्यातील वनसडी येथे रात्री झालेला वादळात चटप यांच्या शेतात वीज खांब जमिनीवर पडला तसेच त्यातून जिवंत विद्युत प्रवाह सुरू होता. सकाळी नारायन विश्वनात उरकुडे याच्या मालकीचा बैल शेतातून जात असताना विद्युत ताराचा स्पर्श झाल्याने बैल जागीच ठार झाला. दुसरा बैल पिंपरी येथील संतोष पांवडे यांच्या बैलांनी रोहित्राला स्पर्श केल्याने मृत्यू झाला.
पोलिस स्टेशन, कनिष्ठ अभियंता कोरपना व पशुअधिकारी यांना देण्यात या घटनेत दोन्ही शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती आली. महावितरण कोरपना क्षेत्रातील शेतातील पडलेल्या विद्युत पोलचे दुरुस्तीचे काम वेळेवर होत नसल्यामुळे परिसरातील शेतकरी वर्ग महावितरणमुळे हैराण आहे. पावसाळा तोंडावर आला.मात्र कोरपना क्षेत्रातील बऱ्याच शेतकऱ्याच्या शेतातील पोल झुकलेले व विद्युत तारा लोंबकळत असल्यामुळे अशा घटनेत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महावितरणने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.