कारंजा (लाड) : अभिनेते म्हटले म्हणजे व्हि आय पी व्यक्तिमत्व. त्यांच्या अभिनयावर अक्षरशः फिदा होवून त्यांचे चाहते रसिक प्रेक्षक त्यांच्याशी संवाद साधण्याकरीता अक्षरशः तडफडत असतात.परंतु हे अभिनेते मात्र आपल्या चाहत्यांनाच प्रत्यक्ष भेटायला त्यांना स्वाक्षरी द्यायला टाळाटाळ करीत असतात.आपला कार्यक्रम संपला की एकतर हे अभिनेते तात्काळ निघून जातात.किंवा विश्रामगृहावर विश्रांती करीत असतात.परंतु याला अपवाद ठरले ते "संत गजानन शेगावीचे" या मालिकेतील, कोंडोलीच्या संत पितांबर महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेते दिपक नांदगावकर ; "स्वराज्य रक्षक संभाजी" मधील अभिनेते नितेश ललित ; आणि झाडीपट्टी रंगभूमिसह मराठी सिने अभिनेते असणारे विशाल तराळ. कारंजा आगमना करीता त्यांचे निमित्त होते ते म्हणजे हाडाचा तरुण नाट्यकलावंत तथा "अविष्कार सामाजिक क्रिडा शिक्षण बहु. संस्थेचा संस्थापक अध्यक्ष आश्विन जगताप" यांनी कारंजा येथे आयोजीत केलेला एकदिवशीय अविष्कार नाट्य महोत्सव २०२५. या कार्यक्रमा करीता सदर अभिनेत्यांचे प्रमुख पाहुणे म्हणून कारंजा येथे आगमन झाले होते.
त्यांच्या हस्ते कारंजा येथील भजन स्पर्धेचे बक्षिस वितरण आणि कलाकार तथा लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाचा पत्रकारांचा सन्मान सोहळा संपन्न झाला. आमचा लाडका मित्र आश्विन जगताप यांनी वेळेवर 'न भुतो न भविष्यती' प्रमाणे मला सुद्धा प्रमुख अतिथी म्हणून व्यासपिठावर स्थानापन्न होण्याचा सन्मान दिला.आणि तेथेच आम्हा कलावंताचा एकमेकांशी परिचय झाला.कार्यक्रमानंतर आमचे स्थानिक मित्र संजयजी सांगळे यांनी सर्व प्रमुख पाहुणे असणाऱ्या नाट्यकर्मी यांना आणि विशेषतः 'संत गजानन शेगावीचे' मालीकेतील संत पितांबर महाराजांची भूमीका यशस्वीपणे वठविणाऱ्या दिपक नांदगावकर यांना ममतानगर येथील संत गजानन महाराज मंदिरात चालण्याचा आग्रह धरला.
व संत गजानन महाराज मंदिर ममतानगर कारंजा येथे दिपक नांदगावकर,विशाल तराळ आणि नितेश ललित यांचे शाल श्रीफळ देवून त्यांचे उपस्थित गजानन महाराज परिवारातर्फे संजयजी सांगळे यांनी स्वागत व सत्कार केला.त्यानंतर स्थानिक नाट्यप्रेमी श्रीमती ललिताताई माकोडे यांचेकडे अस्सल वऱ्हाडी जेवणाचा (वरण-भात-रोटग्याचा) बेत होता.तेथे सर्व कलावंतानी स्नेहभोजन केले.एवढे मोठे दिग्गज नाट्यकलावंत असूनही दिपक नांदगावकर,विशाल तराळ,नितेश ललित आदींनी आमचे स्थानिक नाट्यकर्मी मित्र डॉ.कुंदन श्यामसुंदर,ज्ञानेश्वर खंडारे,संजयजी सांगळे,संजय कडोळे,प्रदिप वानखडे आदींनी अस्सल वऱ्हाडी पद्धतीने जमिनीवर पालकट मांडून जेवण घेतले.
हा आनंद काही निराळाच होता.त्यानंतर दिग्गज कलावंतानी ऐतिहासिक तिर्थस्थळांचे दर्शन घेण्याची इच्छा प्रगट केली असता विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबईचे विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष संजय कडोळे यांनी म्हणजेच मी स्वतः त्यांच्यासाठी गाईड होऊन,त्यांना श्री.नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे जन्मस्थळ आणि श्री. गुरुमंदिरात घेऊन गेलो. महाराजांचे जन्मस्थळ आणि श्री. गुरुमंदिर दर्शनाने आगळी वेगळी ऊर्जा मिळाल्याचे पाहुण्या कलावंतानी सांगीतले. याप्रसंगी श्री. गुरुमंदिरचे विश्वस्त निलेशजी घुडे यांनी सर्व कलावंताचे स्वागत करून श्री. नृसिंह सरस्वती स्वामी महाराज संस्थान कारंजा तर्फे शाल श्रीफळ देवून सत्कार केला. त्यानंतर भारतामधील सुप्रसिद्ध असलेल्या मातृशक्ती श्री. कामाक्षा पिठाच्या दर्शनार्थ श्री. कामाक्षा देवी मंदिरात त्यांनी दर्शन घेतले.
दर्शनानंतर विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा कडून अध्यक्ष संजय कडोळे, प्रदिप वानखडे,उमेश अनासाने, श्री.कामाक्षा देवी मंदिरचे अध्यक्ष दिगंबरपंत महाराज महाजन यांचे कडून 'गण गण गणात बोते' ची भगवी शाल व श्रीफळ देवून त्यांचा बहुमान करण्यात आला.शहर पोलीस स्टेशन कारंजाचे ठाणेदार दिनेशचंद्र शुक्ला यांनी सुद्धा कलावंताचे स्वागत केले.तर संत श्री.गजानन महाराज मंदिर,शहर पोलीस स्टेशन कारंजा तर्फे सुरेशराव ठाकरे गुरुजी यांनी शाल-श्रीफळ देवून त्यांचा सत्कार केला. यामध्ये या दिग्गज कलावंता सोबत पाच सहा तासांचा वेळ कसा गेला ते कळलेच नाही. मात्र भर उन्हाळ्याच्या दिवसात एवढे फिरूनही सर्व पाहुणे कलावंत हास्यमुख, उत्साही व ताजेतवाणे दिसत होते. विशेष म्हणजे रात्रीला झालेल्या आश्विन जगताप दिग्दर्शीत कारंजा येथील कलावंताच्या "उंच माझा झोका ग . . !" या नाटीकेला सुद्धा त्यांनी उपस्थिती दर्शवून स्थानिक कलावंताचा आणि अविष्कार नाट्य संमेलन कार्यक्रमाचे आयोजक आश्विन जगताप यांचे भरभरून कौतुक केले व वेळोवेळी सहकार्य देण्याबाबत आश्वासित करून कारंजेकरांचा निरोप घेतला. तसेच ऐतिहासिक कारंजा शहरासह, तिर्थस्थळाची माहिती व करंजमहात्म्य सांगीतल्याबद्दल माझे संजय कडोळेचे आभार मानले.त्यांच्या सोबतचा माझा हा अनुभव अविस्मरणिय ठरला. त्यामुळे मी पाहिलेले जिज्ञासू व अभ्यासू अभिनेते दिपक नांदगावकर, विशाल तऱ्हाळ, नितेश ललीत असल्याचे मला स्वाभिमानाने सांगावे वाटत आहे.