कारंजा : साहित्य रत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंतीत्सोव आणि महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी सोहळ्या निमित्त, महाराष्ट्र शासनाच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त - महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण कला क्रिडा व आरोग्य बहुउद्देशिय संस्था उमरा [शमशोद्दिन] ता जि वाशिम च्या वतीने, सोमवार दि २९ ऑगष्ट २०२२ रोजी सकाळी ११ ते ३ पर्यंत, राज्यस्तरिय भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सदर्हू कार्यक्रमात प्रसिद्ध ढोलकीवादक आणि स्त्री अभिनयाच्या माध्यमातून महाराष्ट्राची पारंपारिक लोककला जिवंत ठेवणाऱ्या कलावंताना महाकवी वामनदादा कर्डक राज्यस्तरिय कलारत्न पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. सदर्हु कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानि सांस्कृतिक विभागाचे जिल्हाध्यक्ष शेषराव मेश्राम तसेच प्रमुख पाहुणे म्हणून प्रजानंद भगत, धम्मानंद इंगोले, कविनंद गायकवाड, विलास भालेराव, निरंजन भगत, शाहिर रतन हाडे, शाहिर केशव डाखोरे, आनंदराव डुकरे हे राहणार असून विशेष अतिथी म्हणून विदर्भ लोककलावंत संघटनेचे जिल्हाध्यक्ष, राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त,महाराष्ट्र शासन पुरस्कारार्थी संजय कडोळे तथा लोमेश पाटील चौधरी हे राहणार आहेत. सदरहु कार्यक्रमात महाराष्ट्रातील नामांकित ढोलकीवादक तथा कलापथकाद्वारे उत्कृष्ट स्त्री अभिनय करणार्या कलावंताचा वामनदादा कर्डक राज्यस्तरिय कलारत्न पुरस्कार देऊन गुणगौरव करण्यात येईल यामध्ये पुरस्कारार्थी कविश्वर अवचार, भगवान खडसे, सुनिल सावळे, गणेश राठोड, रतन गायकवाड, अमोल वानखडे, साहेबराव पडघाण, धम्मपाल पडघाण, शाहिर विश्वनाथ इंगोले, सुनिल साबळे यांना सन्मानित करण्यात येईल असे संस्थेचे अध्यक्ष राष्ट्रपिता महात्मा गांधी पुरस्कार प्राप्त शाहिर संतोष खडसे यांनी कळविले आहे.