ब्रम्हपुरी: महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गट प्रवर्तक संघटना आयटक 3 रे राज्य अधिवेशन 27,28 एप्रिल गोंदिया येथे पार पडले.पहिल्या दिवशी शहरातून विराट रॅली काढून आशा व गट प्रवर्तक कर्मचारी यांच्या समस्या बाबतीत सरकारचे लक्ष वेधून घेण्यात आले.प्रतिनिधी सत्रात दुसऱ्या दिवशी आयटक राज्य सचिव कॉ.विनोद झोडगे यांनी मार्गदर्शन केले. केंद्र सरकार आशा गट प्रवर्तक मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. गट प्रवर्तक कंत्राटी कर्मचारी प्रस्ताव केंद्र सरकार कडे आहे. 2018 पासून मोबदला वाढ आशा गट प्रवर्तक ना केलेला नाही. कामगार विरोधी श्रम संहिता तयार करून कामगार हित कायदे मोडून काडले जात आहेत. या विरोधात तीव्र लढा उभारण्याची गरज आहे. येत्या 20 मे 2025 देशव्यापी संप आयटक सह केंद्रीय कामगार संघटना नी पुकारला आहे तो यशस्वी करावा. आशा गट प्रवर्तक संघटना मजबूत करण्याचे आवाहन केले. गोंदिया जिल्हा आयटक पदाधिकारी नी आशा गट प्रवर्तक नी यशस्वी केल्याबद्दल अभिनंदन केले.
राज्य अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी 27 प्रतिनिधी आशा गट प्रवर्तक नी राजकिय व संघटना अहवाल वर चर्चा केली. अधिवेशनात राज्य पदाधिकारी व राज्य कौन्सिल निवड करण्यात आली.
आशा गट प्रवर्तक संघटना अध्यक्ष :-कॉ. राजू देसले (नाशिक)
कार्याध्यक्ष:- कॉ. वैशाली खंदारे - (नंदूरबार)
उपाध्यक्षाः - कॉ. शालुताई कुथे ( गोंदिया)
उपाध्यक्षा:- कॉ. जोन्सा राऊत (आशा) वर्धा
उपाध्यक्षः- कॉ. विनोद झोडगे - (चंद्रपूर)
उपाध्यक्ष :- सुधीर टोकेकर (अ.नगर)
उपाध्यक्ष :- शिवकुमार गनवीर (भंडारा)
उपाध्यक्ष:- कॉ. मुगाजी बुरुड (वाशीम)
उपाध्यक्ष :- ________ (नागपूर)
सरचीटनीसः - मंदा डोंगरे (आशा) नागपूर
खजिनदार:- विजय बचाटे (सांगली)
संघटक :- प्रफुल देशमुख (अमरावती)
संघटक:- नयन गायडवाड (अकोला)
संघटक:- रामचंद्र पाटिल (गोंदीया)
संघटक:-____________
सचिव :- सोनु कोकसे (गटप्रवर्तक - नागपुर)
सचिव :_______(गटप्रवर्तक- वर्धा)
सचिव :- निकीता निर
(चंद्रपूर- आशा)
सचिवः- गुली पावरा ( नंदूरबार गटप्रवर्तक)
सचिव :- वसंत पाटिल (धुळे)
सचीवः - भूमिका वंजारी (भंडारा आशा)
सचिवः- विद्यादेवी येजुलवार (गट प्रवर्तक गडचिरोली) राज्य कौन्सिल सदक्ष पदी कॉ.वर्षा घुमे,किरण धोंगडे चंद्रपूर यांची निवड करण्यात आली.
: आयटक जनरल सेक्रेटरी- श्याम काळे व कामगार नेते दिलिप उठाने यांच्या मार्गदर्शनात
खालील ठराव संमत करण्यात आले.
ठराव 1.आशा व गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचारी दर्जा द्या ,
2. शासकीय दर्जा मिळेपर्यंत गटप्रवर्तकांना त्वरित कंत्राटी कर्मचारी दर्जा देऊन आरोग्य विभागात समायोजन करा.
3. आशा कर्मचाऱ्यांना किमान वेतन 24 हजार रुपये द्या . गटप्रवर्तकांना 34 हजार रुपये किमान वेतन देऊन वेगळा प्रवास भत्ता द्या.
4. आजारपणाणे मृत्यू झाल्यास कार्यरत आशा व गटप्रवर्तकांना 10 लाख रुपये पर्यंत मदत द्या .
5.आशा व गटप्रवर्तकांना राज्यभर एकच गणवेश करताना आशा व गटप्रवर्तकांचे मत जाणून घ्या व त्यानंतर रंग निश्चित करा .अंगणवाडी कर्मचारी गणवेश गुलाबी रंग सक्ती आशावर नको गटप्रवर्तकांना विश्वासात घेऊन रंग निश्चित करा .
6.कंत्राटी कर्मचारी गटप्रवर्तक प्रस्ताव हा महाराष्ट्र शासनाने त्वरित केंद्र सरकारने मंजूर करावा.
7. दिवाळीला आशा व गटप्रवर्तकांना बोनस द्या.
8. यशदा मार्फत अशा व गटप्रवर्तकांचे कामाचे मूल्यमापन करून किमान वेतन द्या .दहा टक्के जागा जिल्हा परिषद सेवेत रिक्त ठेवण्यात याव्या .
9.केंद्र सरकारने आशा गटप्रवर्तकांना 2018 पासून मोबदला वाढ केलेली नाही . त्याविरोधात तिव्र संघर्ष करण्याचा निर्धार करीतआहोत.
10. केंद्र सरकारने कामगार विरोधी श्रमसहिता केलेल्या आहेत ते मागे घ्यावेत यासाठी 20 मे 2025 रोजी देशव्यापी संप पुकारला आहे कामगार विरोधी शेतकरी विरोधी केंद्र सरकारच्या विरोधात एल्गार केलेला आहे 20 मे संप यशस्वी करा .
11.राज्य सरकारने जनसुरक्षा कायदा आणलेला आहे तो कायदा संविधान विरोधी आहे व सरकार विरोधी आंदोलन दाबण्याचा व अभिव्यक्ती विरोधी आहे तो मागे घ्या.
12 आशा गटप्रवर्तकांना आरोग्य विमा पाच लाखांचा द्या.
13.महाराष्ट्रात मंत्रिपदावर असलेले तसेच संविधानिक पदावर असलेले लोकप्रतिनिधी धार्मिक जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य करत आहे याचा आम्ही निषेध करतो केंद्र सरकारने कठोर कारवाई करावी .
14.महापुरुषांची बदनामी करणाऱ्यांच्यावर कठोर कारवाई करा
15.महिला अत्याचार रोखण्यासाठी कठोर धोरण राबवा .
16.आशा गटप्रवर्तकांना इतर योजना कर्मचाऱ्याप्रमाणे प्रसूती रजा भर पगार सहा महिन्याचा देण्यात यावा.
नवनिर्वाचित पदाधिकारी सत्कार जेष्ठ कम्युनिस्ट नेते कॉ. शिवकमार गणवीर यांच्या हस्ते करण्यात आला.
तसेच शेखर कनोजिया, चरणदास भावे जेष्ठ आयटक नेते सत्कार करण्यात आला.
नवनिर्वाचित अध्यक्ष राजू देसले यांनी या पुढील काळात आशा आशा गट प्रवर्तक प्रश्नांवर तीव्र लढा उभारण्याची एकजूट करण्याचे आवाहन केले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....