महाराष्ट्र-तेलंगणा राज्याला जोडणाऱ्या निर्माणाधीन राष्ट्रीय महामार्गावर राजुरा तालुक्यातील पांढरपौनी गावाजवळ एसटी बसला भीषण अपघात झाला.
यामध्ये दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना काल (मंगळवार) सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली.
या विषयी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, राजूरा तालुक्यातील महाराष्ट्र- तेलंगणा राज्याला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग निर्माणाधीन आहे. याच मार्गावर पांढरपौनी गावाजवळ काल (मंगळवार) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एन एन ग्लोबल कोल वाशरी येथीलकामगार संदिप सिंह (वय 31 ) व दुसरा एक कामगार आपल्या दुचाकीने पांढरपौनी येथे परत येत होते. राजुरा येथून पालगाव येथे जाणारी चंद्रपूर पालगाव बस क्र एम. एच. 07 सी 9538 ह्या बस व दुचाकीचा जोरदार अपघात झाला. बसखाली आल्याने दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला.
प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार राजुरा कडून बस येत असतानाच दुचाकीस्वार अचानक पांढरपौनी गावाच्या मार्गावर वळले. समोर अचानक दुचाकी आल्याने बस चालकाने ब्रेक मारला व बस बाजुला घेण्याच्या प्रयत्नात बस रत्याच्या बाजूला नालीत अडकली. मात्र बस मधील प्रवाशी सुरक्षित आहेत.