कारंजा (लाड) : महाराष्ट्राचे आराध्य दैवत,करोडो वारकर्यांचे मायबाप विठुरुक्मिणी चे लाखो वारकरी कारंजा शहरात असून, येथे कुंमारपुरा कारंजा येथे प्राचिन मंदिर असून, पहाडपुरा येथील प्राचिन वाड्यातील विठ्ठल मंदिर, लोकमान्य नगरातील नागोबा बोकोबा श्री गजानन मंदिरातील विठ्ठल मंदिर आणि पर्यटन केन्द्रा समोरील, टेलिफोन कॉलेनीतील विठ्ठल मंदिर सुप्रसिध्द आहे. शिवाय ब्रम्हांडनायक श्री सत गजानन महाराज यांना सुद्धा श्री विठ्ठलाचे प्रतिरूप माणन्यात येत असल्याने सत गजानन महाराज मंदिरात, आज गुरुवार दि. 29 जून रोजी भाविकांची मांदियाळी दिसून येत आहे.
. विदर्भ लोककलावत संघरना कारंजा तथा जय भवानी जय मल्हार वारकरी मंडळ कारंजाचे संजय कडोळे, उमेरा अनासाने यांनी आज शहरातील तमाम मंदिराचा दोरा करून आढावा घेतला असता, श्री संत गजानन महाराज मदिर, टेलिफोन काँलेनी येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात महाभिषेक व पूजा अर्चने नंतर दर्शनार्थी शांताता व शिस्तीने रांगेत दर्शन घेत असल्याचे दिसून आले मंदिर समिती व विश्वस्त मंडळाने दर्शनार्थी करीता पिण्याचे पाणी, उपवासाचा फराळ, फळे व चहापानाची चोख व्यवस्था केली होती . आज रात्री येथील मंदिरात भजन संध्या आयोजीत करण्यात आलेली असून, संपूर्ण कारंजा शहरात भक्तिमय आनंद ओसंडून वहात होता. शहरातील शांतता व सद्भावना अबाधित राखण्याकरीता,कारंजा शहर पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार पोलिस निरिक्षक आधारसिह सोनोने यांनी पोलिस दलासह गृहरक्षक दलाचा बंदोबस्त मंदिरावर लावल्याचे आढळून येत होते. असे वृत्त महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी कळवीले आहे.