वरोरा तालुक्यातील आसाळा या गावी पंधरा ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी शाळेतील शिक्षक व नागरिकांनी, शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये आपल्या देशाविषयी प्रेम, देशभक्ती निर्वाण व्हावी, याचे बाळकडू बालपणीच त्यांच्या अंगी रुजविण्यासाठी 15 ऑगस्ट हा दिन अनोळख्या पद्धतीने साजरा केला, प्रथमच शाळेतील "विध्यार्थी मुख्यमंत्री"यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
देवांश संजय राजनहिरे, इयत्ता चवथी या शाळकरी मुलाने आज दिनांक 15 ऑगस्ट रोजी शाळेच्या आवारात ध्वजरोहन करण्याचा मान मिळविला,
यावेळी शाळेतील वर्गशिक्षक, सुज्ञ नागरिक, शाळकरी मुले यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.