अकोला:-
आज आझाद मैदानावरील आंदोलनात कॉ नयन गायकवाड, कॉ. सुनीता पाटील, कॉ. दुर्गा देशमुख यांच्या नेतृत्त्वात अकोल्यातील हजारो अंगणवाडी कर्मचारी मोठ्या संख्येने होत्या व मोठ्या संख्येने राज्यातील कानाकोपऱ्यातून अंगणवाडी सेविका व मदतनीस पावसाची पर्वा न करता सहभागी झाल्या. त्यांची संख्या खूप असल्याने व पोलिसांकडे अटक करण्यासाठी गाड्या नसल्याने काही जणांना पोलिसांनी अटक केले व बाकीच्या हजारो महिलांची नावे आझाद मैदानावरच नोंदवून त्यांना अटक झाल्याचे दाखविले.तसेच आज राज्यातील अंगणवाडी केंद्र देखील बंद ठेवून हजारो अंगणवाडी कर्मचारी यांनी शासनाचा निषेध नोंदविला.
दि 23 सप्टेंबर पासून आझाद मैदानावर आयटक व कृती समितीचे उपोषण चालू होते. काल जवळ जवळ 8 ते 9 महिन्यानंतर महिला व बाल कल्याण मंत्री, मा. आदिती तटकरे ह्यांची कृती समितीच्या नेत्यांसोबत जवळजवळ एक तास बैठक झाली. बैठकीत त्यांनी मानधनवाढीच्या प्रस्तावाबाबत उद्या वित्तमंत्री, मा अजित पवार मंजूरी देतील व त्यानंतर येणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत त्यास मंजूरी देण्यात येईल असे स्पष्ट आश्वासन दिले. तसेच पेन्शनच्या प्रस्तावाबाबत काही त्रुट्या आहेत त्या लवकरच दूर करून त्याही प्रस्तावाला अंतिम करण्यात येईल असे सांगितले. ग्रॅज्युईटीबाबत देशपातळीवर लवकरच निर्णय घेण्यात येईल असे सांगितले.
मा. मंत्रीमहोदय यांच्या आश्वासनाचे आयटक व कृती समितीने स्वागत केले. परंतु जो पर्यंत कॅबिनेटचा निर्णय होवून जी. आर. निघत नाही तोपर्यंत आझाद मैदानावरील "ठिय्या आंदोलन" चालूच ठेवण्याचा सर्वानुमते निर्णय घेतला आहे. व नागपुर मध्येही आंदोलन करण्याचा निर्णय झाला सुरवातीला रोजच्या "ठिय्या आंदोलनात" मुंबई व जवळचे जिल्हे सहभागी होतील. आणि नंतर GR निघाला नाहीतर आंदोलन सर्व जिल्हे सहभागी होतील म्हणुन महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे मानधन वाढ दरमहा पेन्शन उपदान ग्रॅज्युएशन शासन निर्णय (जीआर) काढण्याचे दिलेले आश्वासन पाळा कॉ. नयन गायकवाड यांनी केले
आंदोलनात, कॉ. सुनीता पाटिल जिल्हा अध्यक्षा व राज्य सचिव.
कॉ. नयन गायकवाड राज्य संघठन सचिव.व जिल्हा सचिव कॉ. दुर्गा देशमुख,कॉ. ज्योती ताथोड, कॉ. सुनंदा पदमने, कॉ. वंदना डांगे, कॉ. माधुरी परणाटे, कॉ. मंगला मांजरे, कॉ. प्रिया वरोटे, प्रिया गजभिये, जया शिरसाट, रेखा महल्ले, अनीता अंभोरे, सुनीता गुप्ता, मीरा दही, जया मार्के, सह हजारो अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया द्या....