कारंजा (लाड) : स्थानिक जे.डी. चवरे विद्या मंदिर,कारंजाची इयत्ता ७ वीची,विद्यार्थिनी हिने, श्री. गोविंदसिह राठोड शिक्षण प्रसारक मंडळ, दहातोंडा कडून स्व.सिताबाई राठोड स्मृतीप्रित्यर्थ घेण्यात आलेल्या,विभागीय माध्यमिक विभागाच्या निबंध स्पर्धेत रोख पारितोषिक प्राप्त करीत तृतिय क्रमांकाचे स्व. सिताबाई राठोड स्मृती पारितोषिक मिळवल्याबद्दल वाशिम जिल्हा गोंधळी समाज संघटनेकडून जिल्हाध्यक्ष संजय कडोळे,यांनी तीचा गुण गौरव करीत,तीचे अभिनंदन करून, वाशिम जिल्हा गोंधळी समाज संघटनेकडूनही रोख बक्षिस दिले. यशस्वी विद्यार्थीनी कु.समृद्धी कडोळेचे उपस्थितांनी अभिनंदन केले.