पोलिसांनी विविध मार्गावर झडती घेऊन देशी, विदेशी, हातभट्टीची अशी दणाणले आहेत.
दुचाकी वाहनाने अवैधरीत्या दारूची चोरटी वाहतूक करताना आरमोरी एकूण १ लाख ५ हजारांची दारू व वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या ६ दुचाकी असा एकूण ४ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आठ आरोपींविरोधात गुन्हा नोंद केल्याने दारू विक्रेत्यांचे धाबे
२९ जून रोजी अरसोडा नहराजवळ मोटारसायकलवरून दारूची वाहतूक करणाऱ्या एका दुचाकी वाहनाला थांबवून २८ हजार रुपयांची देशी व विदेशी दारू व एक मोटारसायकल असा एकूण ७८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी मोहझरी येथील सुरेश वामन महामंडरे यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. २९ जूनला बेळगाव येथे सुखीराम राऊत व सुलक्षण वासेकर यांच्या घरातून ८ हजार रुपये किमतीची ४० लिटर हातभट्टीची दारू जप्त केली. २८ जून रोजी मानापूर ते देलनवाडी रस्त्यावर ४० लिटर हातभट्टीची आठ हजार रुपये किमतीची मोह दारू व मोटारसायकल पोलिसांनी जप्त केली. याप्रकरणी देलनवाडी येथील अंकुश राजेंद्र साम यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला. २७ जून रोजी कोंढाळा येथील रत्नदीप भाऊराव शेंडे यांच्याकडून १६ हजार ५०० रुपये किमतीची विदेशी दारू व दुचाकी असा एकूण ५६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. यासह अन्य कारवायांमध्ये दारू व दुचाकी जप्त केल्या.
ही कारवाई पोलिस निरीक्षक संदीप मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली आरमोरी पोलिसांनी केली.