कारंजा : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सोहळ्या निमीत्य विविध घोषवाक्याच्या गजरात रिमझिमत्या पावसात गावातून प्रभात फेरी काढण्यात आली.जि.प. शाळा इंझा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न डॉॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ.जोत्सना ठाकरे यांनी ध्वजस्तंभाचे पूजन करून राष्ट्रध्वज फडकवीला.याप्रसंगी मनभा सर्कलच्या जि.प.सदस्या सौ.सुनिता नाखले, सरपंच संकेत पाटील नाखले,शाळेचे मुख्याध्यापक अनिल पागृत, विजय ढोके (प.शि.) कु.माधुरी सवने (स.शि.)अजय चव्हाण (स.शि.),ग्रामसेवक अमोल पाटील,आरोग्य सेवक काळे,युवानेते व संपादक गणेश बागडे, अंगणवाडी सेविका सौ भगत, सौ शालू भोयर तसेच सर्व ग्रा.प.सदस्य,शाळा व्यवस्थापन सदस्य व गावातील उत्साही नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अमृत महोत्सवी कार्यक्रमाअंतर्गत शाळेमध्ये दि १३ ,१४ व १५ आँगस्ट दरम्यान विविध खेळ व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.तसेच संपुर्ण गावात घरोघरी तिरंगा झेंडा लावून व रोशनाई करून अमृत महोत्सव अतिशय आनंदाने साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अजय चव्हाण यांनी केले
१५ आँगस्ट रोजी जि.प.शाळा इंझा येथील ध्वजारोहणानंतर बुद्ध विहार येथे शांतीदूत भगवान गौतम बुद्ध,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर,क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करून मानवंदना देण्यात आली.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून हार अर्पण करण्यात आले.ग्रामपंचायत कार्यालय इंझा येथे सरपंच तथा युवा क्रियाशिल नेते संकेत पाटील नाखले यांनी ध्वजारोहन करून अमृतमहोत्सवा निमीत्य गावकर्यांना संबोधित केले.
आरोग्य उपकेंद्र इंझा येथे जि.प. सदस्या सौ.सुनिता नाखले यांनी ध्वजारोहन करून राष्ट्रध्वजाला सलामी दिली.स्वातंञ्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात हर घर तिरंगा लावून बहुसंख्य लोकांनी आनंदाचा उत्सव साजरा केला.