वनीकरणाच्या जन आंदोलनासाठी पद्मविभूषण डाॅ.मोहन धारिया यांनी युवा पिढीला पर्यावरण दृष्टी दिली असे प्रतिपादन वनराईचे बबनराव कानकिरड यांनी केले.
महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय गांधीग्राम च्या वतीने सांगवी बाजार येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिरात "पर्यावरण संतुलन काळाची गरज" या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. पर्यवेक्षक प्रा.धनंजय पटोकार कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ सर्वोदयी महादेवराव भुईभार ,उपप्राचार्य संजय म्हैसने ,कार्यक्रमाधिकारी डॉ.विजय चव्हाण, सह कार्यक्रमाधिकारी प्रा. जगन्नाथ बरडे, प्रा.प्रफुल्ल डोंगरे, प्रा.मोक्षदा इंगोले, नाजूकराव गवळी ,हरिभाऊ कुकळकर, मधुकरराव काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पद्मविभूषण डाॅ.मोहन धारिया जन्मशताब्दीनिमित्त दि. 18 व 19 जानेवारी2025 ला अकोला येथे आयोजित वनराई बालकुमार साहित्य संमेलनात विद्यार्थ्यांनी सहभाग घेण्याचे आवाहन बबनराव कानकिरड यांनी केले.
कृषी कीर्तनकार महादेवराव भुईभार यांनी गाडगेबाबांच्या कीर्तनशैलीतून विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. आई-वडिलांची पूजा करा. पुस्तके वाचा व विचार करा असे भावस्पर्शी प्रतिपादन केले. राष्ट्रीय सेवा योजना कनिष्ठ महाविद्याल गांधीग्राम चे विशेष ग्रामीण शिबीर दत्तक ग्राम सांगवीबाजार येथे २६ डिसेंबर2024 ते 1 जानेवारी 2025 दरम्यान आयोजन केले असल्याची माहिती प्रा. डॉ. विजय चव्हाण यांनी प्रास्ताविकातून दिली.
प्राचार्य विलास झांबरे, महात्मा गांधी मेमोरियल ट्रस्ट अकोलाचे उपाध्यक्ष संजय इंगळे,शुभम ठोकणे यांनी शिबिरास सदिच्छा भेट देऊन मार्गदर्शन केले . पाहुण्यांचा परिचय रेणुका सरोदे व मयुरी कुकडे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे संचालन कु.ज्ञानेश्वरी मिर्झापुरे हिने केले. तर आभार प्रदर्शन कु. नंदिता ओहे हिने केले. शिबिरात दररोज प्रार्थना, योगासने, श्रमदान ,बौद्धिक चर्चा ,व्याख्याने आयोजित केले आहे.लोकनेते भाई प्रदीप देशमुख, प्रा. पुंडलिकराव भामोदे,प्रा.दीपक पटोकार, प्रा.रमेश भड यांनी शिबीरार्थ्यांचे उद्बोधन केले. राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली.