नागभिड ----स्थानिक राष्ट्रपिता महात्मा गांधी कला व विज्ञान महाविद्यालय नागभीड येथे नव प्रवेशित विद्यार्थाचे स्वागताचा कार्यक्रम फ्रेशर्स-२०२२ महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. गणपतराव देवाजी देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला .
कार्यक्रमास मार्गदर्शक आक्सफोर्ड स्पीकर्स अकॅडेमी नागपूरचे संचालक डॉ. संजय रघडाटे होते. प्रमुख अतिथी डॉ. अमीर धम्मानी, प्राचार्य, ग्रामगीता महाविद्यालय, चिमूर होते तर गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य मा. अजयजी काबरा व मा अक्षयजी वनमाळी यांची उपस्थिती होती .
डॉ. संजय रघडाटे यांनी मार्गदर्शन करतांना, जीवनातील सुंदर सोबती म्हणजे आपला आत्मविश्वास होय’ असे सांगून ‘ महाविद्यालयीन विद्यार्थानी शिक्षणाविषयीचा उत्साह वाढवुन समाज सेवेसाठी सतत तत्पर असावे. असे सांगितले. डॉ. अमीर धम्मानी यांनी महाविद्यालयातील प्रत्येक प्राध्यापक हा विद्यार्थ्यापर्यंत ज्ञानदानाच्या सेवेचे व्रत जोपासत आहे तरी आपले जीवन स्वयंप्रेरणेने प्रफुल्लीत करावे. असे सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . गणपतराव डी. देशमुख यांनी अध्यक्ष स्थनावरून, विद्यार्थाना महाविद्यालयाच्या विविध विभागाविषयी माहिती व्हावी व अंगी असणा - या सुप्त गुणांना चालना मिळावी. यासाठी अशा कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयात होणे गरजेचे आहे. असे सांगितले.
प्रस्तुत कार्यक्रमाचे सूत्र संचालन कु. श्रावणी देशमुख व कु. गायत्री सहारे हिने मानले .
कार्यक्रमास गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री. श्रीकृष्ण देव्हारी, मा. श्याम पाथोडे अध्यक्ष पञकार संघ नागभिड, तथा महाविद्यालयीन प्राध्यापकवृंद , शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. प्रचल ढोक, प्रा. किशोर बोरकर, डॉ. अंकुश कायरकर प्रा. धनंजय मडावी व प्रा. प्रेमकुमार खोब्रागडे व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....