गडचिरोली:- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त जिल्हा काँग्रेस कमिटी व अनुसूचित जाती विभाग काँग्रेस गडचिरोली च्या वतीने 14 एप्रिल 2022 रोजी जिल्हा काँग्रेस कार्यालय गडचिरोली, येथे सकाळी 10 वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील व गडचिरोली शहरातील रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करावे असे आवाहन जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे व अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे यांनी केले आहे.