वाशिम (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे .) : शासन आपल्या दारी हा उपक्रम राज्यभर राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना कमीत कमी कालावधीत योजनांचा लाभ देणे हा उद्देश आहे. नगर परिषद, वाशिम येथील सभागृहात 8 जून रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत शासन आपल्या दारी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला आमदार लखन मलिक व जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. हे उपस्थित राहणार आहे. तरी जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांसह या कार्यक्रमाला उपस्थित राहावे. असे आवाहन तहसिलदार, वाशिम यांनी केले आहे.