अकोला--- लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेची दिनदर्शिका मोफत स्वरूपात सर्वसामान्यांपर्यंत पोहचत असून त्याचे वितरण आता सातपूड्याच्या पायथ्याशी आदिवासीपर्यंतही पोहचलेले आहे.लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष श्री स्वप्निल देशमुख यांनी सातपुड्याखाली संग्रामपूर तालूक्यात असलेल्या आलेवाडी येथे हा उपक्रम राबविला.यावेळी त्यांचे सोबत पत्रकार कदीरभाई, रवि शिरस्कार व आदिवासी बांधव उपस्थित होते.लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक -अध्यक्ष श्री संजय एम.देशमुख यांचे विश्वप्रभात या दर्जेदार वृत्तपत्राचे ही काही स्वतःहून वर्गणी आणून देणाऱ्या मोजक्या वर्गणीदारांचे अपवाद वगळता असंख्य वाचकांच्या सेवेत ११ वर्षांपासून विनामुल्य रूजू होत आहे.त्याचप्रमाणे आता त्यांनी स्थापन केलूल्या या संघटनेकडून लोकस्वातंत्र्यच्या दिनदर्शिकेचेही असेच व्यापक स्वरूपात विनामुल्य वितरण सुरू ठेवलेले आहे.त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक अभिनव उपक्रमांनी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा सामाजिक वारसा आणि नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचलेलं आहे.
अनेक प्रस्थापित संस्था,संघटनांकडून वार्षिक दिनदर्शिका काढून त्याची विक्री केली जाते.परंतू बुलढाणा व अकोला जिल्ह्यात जिल्हाधिकारी ,पोलिस अधिक्षक व बॅंका,सार्वजनिक ठीकाणे आणि तत्सम कार्यालयांमध्ये लोकस्वातंत्र्यच्या दिनदर्शिकेचे व्यापक प्रमाणात वितरण करण्यात आले.त्याचप्रमाणे शहरांपासून दुर असणाऱ्या आदिवासींना दिनदर्शिका मिळत नाहीत.त्यांना कोणी नेऊनही देत नाहीत,आणि ४० ते ४५ रूपयांची दिनदर्शिका ते विकत घेऊ शकत नाहीत.हा विचार करून लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष श्री.स्वप्निल देशमुख यांनी संवेदनशीलतेने या आदिवासींपर्यंत पोहचण्याचा निर्णय घेतला.त्यासाठी आपल्या पत्रकार मित्रांन घेऊन ते सातपुड्याच्या पायथ्याशी सामावलेल्या आलेवाडी गावात पोहचले.असंख्य आदिवासींच्या हातात त्यावेळी लोकस्वातंत्र्यची दिनदर्शिका फडफडत होती.आपणास घरापर्यंत येऊन कुणी मोफत दिनदर्शिका दिल्याचा आनंद यावेळी आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर दिसत होता.