कारंजा लाड -- भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त दरवर्षी प्रमाणे यंदा ही स्व इंदिरा गांधी चौक येथे शहर काँग्रेस कमिटी च्या वतीने ध्वजारोहणाचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे सरचिटणीस व वाशिम जिल्हा काँग्रेस चे प्रभारी देवानंदभाऊ पवार यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे सचिव दिलीप भोजराज, शहर कॉग्रेस कमिटी चे अध्यक्ष अमीर खान पठाण यांची प्रमुख उपस्थिती होती .ध्वजारोहण संपन्न झाल्यानंतर राष्ट्रगीत म्हणण्यात आले. यानंतर स्व इंदिरा जी गांधींच्या फोटोला मान्यवरांनी हारपर्ण करून अभिवादन केले.
यावेळी सामाजिक कार्यकर्त व माजी न प सदस्य इरशाद भाई पहेलवान, गुलजमाखांन पहेलवान , ॲड संदेश जैन जिंतुरकर , सैय्यद इरशाद भाई, ॲड वैभव लाहोटी, अक्षय बनसोड, विजय कडु , आसिफ खांन, अभिजित शिंदे, अनिस भाई, बिस्मिल्ला खांन, फिरोज भाई,सचिन पाटील, युसुफ भाई जट्टावाले, समीर खांन, जावेद खांन, अख्तर लाला, अनिस भाई, उमेश शितोळे, जफर खांन ,शोराब पठाण, मुन्नाभाई, नावेद खांन, ऋषी आडे, एजाज भाई, फैजान खांन यांच्या सह काँग्रेस चे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यकमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संदेश माणिकचंद जिंतुरकर यांनी केले. राष्ट्रगीतासह राष्ट्रध्वजाला सलामी देत कार्यकमाचा समारोप झाला.
यानंतर देवानंद पवार यांनी उपस्थित सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या
आपल्या प्रतिक्रिया द्या....