कारंजा (लाड) : दि. 17 मार्च 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंतीत्सव तिथीप्रमाणे मोठ्या उत्साहात ग्राम पोहा येथे साजरा करण्यात आला. यासंदर्भात महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांना मिळालेल्या वृत्तानुसार,ग्राम पोहा
येथील शिवजयंतीत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती निमित्ताने तिथी नुसार दि. 17 मार्च 2025 रोजी सायंकाळी सहा वाजता राजधानी चौकातून भव्य मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली.या मिरवणूकीमध्ये गावातील गजानन महाराज भजनी मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर पोवाडे, शौर्यगीत,भजनांच्या गजरात या मिरवणुकीला सुरुवात झाली.जय भवानी ! जय शिवाजी !! हर हर महादेव !!! अशा गर्जना देत मिरवणूक संपूर्ण गावातून काढण्यात आली. या मिरवणूकीमध्ये गावातील बहुसंख्य नागरिक तसेच युवकांनी सहभाग घेतला होता. मिरवणूक आटोपल्यानंतर शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला शिवजयंती उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष विलास पाटील सुरळकर, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष निलेशआप्पा पुणेवार, उपाध्यक्ष सुधाकर पवार व त्यांचे सर्व सहकारी तसेच गावातील माजी जि. प.सदस्य आशिष दहातोंडे,माजी सरपंच राजू राठोड,तंटामुक्ती अध्यक्ष दिगंबर मरकाम, कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपाध्यक्ष सुरेश पाटील दहातोंडे,गजानन महाराज साळवे,सुभाष चौधरी महादेवराव ढेरे, पुंडलिक नितनवरे, संजय आप्पा पुणेवार , पोलीस पाटील गजानन वर ,माजी तंटामुक्ती अध्यक्ष केशव जाधव, माजी सैनिक दिगंबर मरकाम, गोपाल राऊत व गावातील बहुसंख्य नागरिक कार्यक्रमाला उपस्थित होते.
सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून, राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करीत हारार्पन करण्यात आले. यावेळी शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने माजी सैनिकांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर कु. राशी प्रवीण मुंदे, कु. अन्वी राहुल सुरळकर, कु. श्रेया दिनेश सुरळकर, कु किमया मारुती मावळ, हर्ष अमोल सुरळकर या लहान बालकांनी शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. आणि उपास्थितांची मने जिंकली. तसेच माजी जी.प. सदस्य आशिष दहातोंडे, गजानन महाराज धाडवे, विलासराव सुरळकर यांनी सुद्धा शिवाजी महाराजांच्या जीवनावर भाष्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पुणेवार तर आभार प्रदर्शन अमोल सुरळकर यांनी केले. अत्यंत शांतता व शिस्तीत संपन्न झालेल्या हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता शिवजयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली.