सामान्य जनतेसह राज्यातील मतदारांच्या उन्नतीसाठी बहुजन जनता दल प्रयत्न करणार असून समाजातील अनेक नागरिकांचा आणि मतदारांच्या विकास झाला पाहिजे यासाठी बहुजन जनता दल राज्य सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरेल असे मत बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांनी व्यक्त केले
स्थानिक स्वराज्य संस्था सार्वजनिक निवडणूक विदर्भस्तरीय कार्यकर्ता व मतदार संपर्क अभियान अंतर्गत अकोला बाळापूर रोड वरील हॉटेल श्री कृष्ण लॉन्स येथे बहुजन जनता दलाच्या वतीने विदर्भस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक संदर्भात महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन केले होते तेव्हा प्रमुख वक्ते म्हणून पंडित भाऊ दाभाडे बोलत होते सदर बैठकीचे आयोजन बहुजन जनता दलाचे अकोला जिल्हा अध्यक्ष संतोष गवई यांनी केले. तर या बैठकीला बहुजन जनता दलाचे माजी नगरसेवक रामदास गोरले माजी नगरसेवक केशवराव गंगणे नगरसेविका सौ प्रमोदिनी डावखरे पुष्पाताई मदन गिरी लता पानसरे संगिता भुरे दिपक निगडे सुभाष पाटील किशोर गावंडे महेंद्र बरकडे राजेश वाघमारे गजानन पाटील किशोर कदम विनय वाडकर सुरेश नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते तर अनेक मान्यवर यांनी आपले विचार व्यक्त केले बैठकीचे सूत्रसंचालन हिम्मत गावडे यांनी केले तर आभार प्रदर्शन बहुजन जनता दलाचे अकोला जिल्हा अध्यक्ष संतोष गवई यांनी केले. सदर बैठकीला विदर्भस्तरीय बहुजन जनता दलाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते