बोईसर मध्ये ऐतिहासिक कार्यक्रम.,!बोईसर येथे गणेश भक्त झाले खुश, जेव्हा मुस्लिम विकास सामाजिक संस्था च्या पदाधिकारीने गणेश भक्तांवर केला फुलांच्या वर्षाव, गुलाब फुलाने प्रत्येक पदाधिकारीच्या स्वागत करण्यात आला.
बोईसर येथे अवध नगर मध्ये मुस्लिम विकास सामाजिक संस्थांच्या अध्यक्ष आशाद शेख, सचिव अब्दुल्ला शेख उपसचिव इस्तियाक सय्यद, कार्यकारिणी सदस्य गुल मोहम्मद खान, एकता सामाजिक संस्थाची अध्यक्ष शमीम यासीन शेख, उपाध्यक्ष मुकाराम खान, सदस्य मुस्कान शेख, इलियास पठान तसेच अवध नगरचे आरिफ मेमन, वसी शेख, इशा खान, मझहर भाई, खरकुल्ला बाबा, सर्वर अली खान, अनिस भाई, अब्दुल मुस्तफा चौधरी व इतरानी अवध नगर येथे स्टॉल लावून गणेश भक्तांच्या कार्यकर्त्यांवर फुलांच्या वर्षाव केला। तसेच प्रत्येक कार्यकर्त्यांना पाण्याचे बॉटल, गुलाबाचे फुल देऊन त्यांच्या स्वागत ही केलं। या ठिकाणी गणेश मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर राहुल यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या स्वागत करण्यात आला।
प्रभाकर राहुल ह्याने बोलताना सांगितलं की गेल्या 26 वर्षापासून ते गणपती बाप्पा मोरया ची मिरवणूक काढतात आणि 26 वर्षाने आज पहिल्यांदा मुस्लिम विकास सामाजिक संस्था मार्फत प्रत्येक कार्यकर्त्यांच्या स्वागत करण्यात आला आहे। तसेच त्यांना ही शॉल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केला, त्याना खूप आनंद वाटला। त्यांनी आपला अनुभव सांगताना बोलले की सर्व धर्म समभाव ही कल्पना पहिल्यापासून त्यांना आहे आणि आज मुस्लिम समाजाने है साबित करुन दाखवले। इतर समाजांनी असंच सर्वधर्मसमभाव एकदम व्यवस्थित राहणे गरजेचे आहे। प्रभाकर राहुल यांनी सर्व मुस्लिम विकास सामाजिक संस्था च्या पदाधिकारी त्यांच्या तोंडात खजूर देऊन आपला आनंद व्यक्त केला।