चंद्रपुर :-दि. 17/9/22 रोजी नागपूर येथील एका या सामाजीक संस्थेकडून पो.नि. बाळसाहेब खाडे, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांना माहिती प्राप्त झाली की, एका 14 वर्ष वयाच्या नाबालीकेकडून ब्रम्हपूरी येथे देह विक्री करून घेतला जात आहे.
सदरची माहिती प्राप्त होताच सदरची माहिती मा. पोलीस अधीक्षक, अरविंद साळवे यांना देण्यात आली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे स.पो.नि.संदीप कापडे, स. पो. नि. मंगेश भोयर व अंमलदार यांचे पथक गठीत करून मिळालेल्या माहिती नुसार ब्रम्हपूरी येथील मालडोंगरी रोड वरील विदर्भ इस्टेट कॉलणी बंगला नं.14 ब्रम्हपूरी येथे एक डमी कस्टमर पाठवून शहानिशा केली. सदरची शहानिशा होताच ब्रम्हपूरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी, मिलींद शिंदे, पो.नि.मनोज गजभे, ठाणेदार चिमूर म.पो.शि. भाविका लाडे व स्थागुशाचे पथक यांनी दोन पंचाना पाचारण करून सदर बंगल्यावर धाड टाकली. सदर ठिकाणावरून एक 14 वर्षीय नाबालीकेची सुखरूप सुटका करण्यात आली.
सदर बाबत अधिक चौकशी केली असता सदर नाबालीकेला कलकत्ता येथून पळवून आणून नागपूर येथे देहव्यापारासाठी दलालाकडे दिले होते. सदर नागपूर येथील दलालाने वेगवेगळया ठिकाणी सदर नाबालीकेकडून देहव्यापार करून घेत असल्याची माहिती मिळाली सदर नाबालीकेला ब्रम्हपूरी येथील आरोपी नामे 1) मंजीत रामचंद्र लोणारे वय 40 वर्षे, 2) सौ. चंदा मंजीत लोणारे, वय 32 वर्षे, दोन्ही रा. मालडोगरी रोड विदर्भ इस्टेट कॉलोनी बंगलो नंबर - 14, ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर हे सदर बंगल्यात ठेवून देहव्यापार करून घेत होते.
सदर बाबत पो.स्टे. ब्रम्हपूरी येथे अप.क्र.469 / 22 कलम 370, 370 (ए) भा.द.वि. सह कलम 3 4 5 6 7 अनैतीक मानवी व्यापार प्रतीबंधक अधिनीयम 1956, सह कलम 4, 6, 8, 12 बा.ल. अ.प्र.का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढीत तपास पो.स्टे. ब्रम्हपूरी करीत आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अरवींद साळवे, मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी, ब्रम्हपूरी मिलींद शिंदे यांचे नेतृत्वात पो.नि. बाळासाहेब खाडे, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर पो.नि. मनोज गजभे, ठाणेदार पो.स्टे. चिमूर, स्थानिक गुन्हे शाखेचे स.पो.नि. संदीप कापडे, स. पो. नि. मंगेश भोयर, स.फौ. राजेंद्र खनके, पो.हवा. स्वामीदास चालेकर, पो. कॉ. गणेश भोयर, गोपिनाथ नरोटे, प्रदीप मडावी व पो.स्टे. ब्रम्हपूरी येथील म.पो.कॉ. भाविका लाडे यांनी केली असुन पुढील तपास पो.स्टे. ब्रम्हपूरी येथील पोलीस अधिकारी हे करीत आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....