अकोला:-
लोकहित अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. अकोला ची ३० वी वार्षिक आम सभा आबा साहेब खेडकर सभागह अकोला. येथे दिनांक २१ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजीत करण्यात आली अध्यक्ष स्थानी संस्थेचे अध्यक्ष शफीक अहेमद खान गुरूजी प्रमुख पाहुणे म्हणुन व्यासपीठावर संस्थेच्या उपाअध्यक्ष श्रीमती डॉ कनीज आईशा अरब मॅनेजिंग डायरेक्टर सै. युसुफ अली माजी अध्यक्ष मोहम्मद अयुब अब्दुल गफफार सुर्या, संचालक तथा संस्थापक अध्यक्ष श्री एम.बी.एल. अरब सर संचालक श्री शेख इमाम सर संचालीका श्रीमती नसीम अख्तर बाजी संचालीका श्रीमती सैयदा तबस्सुम तसेच संस्थेचे जनरल मॅनेजर श्री मुर्तुजा गांधी व काका साहेब सहकारी प्रशिक्षण केंद्रा तर्फे कुमार कांबे साहेब उपस्थित होते. संस्थेच्या संचालकांचा पुष्पगुच्छ व भेट वस्तु देउन सन्मान करण्यात आला प्रस्तावना आणि सन २०२४-२०२५ चा वार्षिक अहवाल संस्थेचे मॅनेजींग डायरेक्टर श्री सैयद युसुफ अली साहेब यांनी सादर केले. संस्थेच्या उपस्थित सर्व मान्यवर सभासदांनी हात वर करून व टाळयांच्या गडगडाटात प्रत्येक विषयास मान्यता दिली.
संस्थेचे अध्यक्ष श्री शफीक अहेमद खान गुरूजी यांनी संस्थेत सुरू असलेल्या विभिन्न योजनांची माहिती दिली. तसेच व दर वर्षी प्रमाणे या वर्षी ही प्रयेक सभासदाला गिफ्ट देण्याचे जाहीर केले. कर्जदारांना प्रोत्साहीत करण्यासाठी नियमित पणे कर्ज परत फेड करणाऱ्या खालील कर्जदारांना लकी ड्रॉ व्दारे भेट वस्तु देवुन सन्मानित करण्यात आले. १. पर्सनल लोन ईश्वर मिसरीलाल कुरील २. एच. पी लोन मोहम्मद नासीर मोहम्मद युसुफ ३. हाऊसिंग लोन नजमा बी शेख युनुस ४. एल.ए.पी. लोन फैजल खान युनुस खान ५. हायपोथीकेशन लोन १. गरीब नवाज स्टील फर्निचर प्रो. हारून शाह अब्दुल्ला शाह
श्री शफीक अहेमद खान गुरुजी यांनी आपल्या अध्यक्षिय भाषणात भागधरकांनी संस्थेवर दाखविलेल्या अतुट विश्वासाबद्दल आभार व्यक्त केले
संस्थेने ऑडीट मध्ये 'ब' वर्ग प्राप्त केले याचे संपुर्ण श्रेय संस्थेचे संचालक मंडळ, जनरल मॅनेजर व कर्मचारी वर्ग यांना दिले व भविष्यात सुध्दा ही संस्था अशीच प्रगती पथाावर राहील याची गवाही दिली.
तसेच उत्कुष्ट कार्य करणारे डेली कलेक्शन एजेंटस
हुसैन सैफोद्दीन घोगारी ,शेख निसार शेख बिस्मिल्ला, शगुफ्ता अंजुम मोहम्मद इकबाल, सैयद इमरान से करीम, मोहम्मद आरीफ इकबाल नुरूल हसन, मोहम्मद नाजीम मोहम्मद साबीर, मोहम्मद इरफान मोहम्मद नसीर, सैयद अकील से गफुर, अब्दुल कादर अब्बास अली, नईमा अंजुम अखतर अली यांना भेट वस्तु देवुन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे बहारदार संचालन अकील अहेमद खान तर आभार प्रदर्शन मोहम्मद आबीद सईद नुरुल हसन यांनी केले.
कार्यक्रम सफल करण्यासाठी संस्थेचे सरव्यवसथापक श्री मुर्तुजा के गांधी, व सर्व कर्मचारी वर्ग यांनी अथक परीश्रम घेतले.
जेवणा नंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
आपल्या प्रतिक्रिया द्या....