गडचिरोली,(जिमाका): महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्या श्रीमती आभा पांडे या दि. 3 जून 2022 रोजी गडचिरोली येथे भेट देणार आहे. सदर भेटी दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात महिलांविषयक प्रकरणांचा आढावा, महिलांच्या सुरक्षिततेबद्दल सद्यस्थिती, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 अंतर्गत प्रकरणांची माहिती, दक्षता समिती, वात्सल्य समिती, समुपदेशन केंद्र, विविध योजनांचा आढावा त्याचप्रमाणे जिल्ह्याच्या ठिकाणी असलेले निर्भया पथक, भरोसा सेल, महिला कारागृह, शासकीय महिला वसतिगृह, वन स्टॉप सेंटर व जिल्हा रुग्णालय यांचा आढावा घेणार आहेत.