कारंजा : भारत स्काऊट्स् आणि गाईड्स्, वाशिम जिल्हा कार्यालय यांच्या वतीने स्थानिक श्री महावीर ब्रह्मचार्य आश्रम या शाळेत भारत स्काऊट्स् आणि गाईड्स् पथकातील संघनायक व उपसंघनायक यांच्या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी गटशिक्षणाधिकारी माने यांनी वरील उद्गार काढले.
भारत स्काउट्स आणि गाईड्स, जिल्हा कार्यालय वाशिम यांच्यावतीने आयोजित संघनायक, उपसंघनायक यांच्याकरिता एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री महावीर ब्रह्मचार्य आश्रम शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश सरोदे हे होते. तर उद्घाटक पंचायत समिती, कारंजा चे गटशिक्षणाधिकारी श्रीकांत माने हे होते. प्रमुख अतिथी म्हणून विस्तार अधिकारी लोखंडे मानोरा तर जिल्हा स्काऊट संघटन आयुक्त राजेश गावंडे, जिल्हा गाईड संघटन आयुक्त प्रिती गोल्हर, जिल्हा स्काऊट प्रशिक्षण आयुक्त
मुरलीधर जाधव व रमेश घुगे हे होते.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते स्काऊट-गाईड चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या प्रतिमेला हारार्पण करण्यात आले. स्काऊट प्रार्थना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मंचावर उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे माझे प्रस्ताविक जिल्हा स्काऊट संघटन आयुक्त राजेश गावंडे यांनी केले. यावेळी मान्यवरांचे हस्ते गाईड विभागांतर्गत राज्यस्तरावर प्रगत प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल वामन महाराज कन्या विद्यालय, कोलार, ता. मानोरा च्या शितल वडूरकर व रामप्यारी कन्या हायस्कूल, कारंजा येथिल माधुरी राऊत या शिक्षिकांचा सन्मान करण्यात आला.
यानंतर प्रिती गोल्हर जिल्हा गाईड संघटन आयुक्त यांनी आपले मनोगत व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना स्काऊट गाईड चळवळी बाबत माहिती सांगितली. प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटक श्रीकांत माने गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती कारंजा यांनी उद्घाटकिय भाषणातून "स्काऊट ची चळवळ ही आंतरराष्ट्रीय चळवळ असून त्या चळवळी आदर्श नागरिक घडवले जातात. आदर्श नागरिक घडवणारी ही एक महत्त्वपूर्ण चळवळ आहे."असे सांगितले. यानंतर अध्यक्षिय भाषणात श्री महावीर ब्रम्हचार्य आश्रम शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश सरोदे यांनी आपल्या अध्यक्षिय भाषणातून विद्यार्थ्यांना "स्काऊट चळवळीचे महत्त्व सांगताना स्वतः शालेय जीवनापासून स्काऊट चळवळीत असल्याचे अभिमानाने सांगितले. स्काऊट चळवळ ही विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्य व सुसंसकार इतर कौशल्य गुणांचा विकास करणारी चळवळ आहे." असे प्रतिपादन केले. उद्घाटकीय कार्यक्रमाचे संचलन यावर्डी येथील बाबासाहेब धाबेकर विद्यालयाचे स्काऊटमास्तर प्रशिक्षक गोपाल काकड यांनी केले तर आभार जिल्हा स्काऊट आयुक्त मुरलीधर जाधव यांनी मानले.
प्रशिक्षण सत्राच्या पहिल्या सत्रात स्काऊट गाईड चळवळीचा इतिहास व माहिती या विषयावर जिल्हा गाईड आयुक्त प्रिती गोल्हर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. दुसर्या सत्रात निलेश मिसाळ, जिल्हा प्रशिक्षण आयुक्त कब विभाग यांनी स्काऊट व गाईड चळवळीचे नियम, वचन, ध्येय, खुण, वंदन, हस्तांदोलन, इत्यादींबाबत प्रात्यक्षिकांसह माहीती दिली.
विश्रांतीनंतर दुपारच्या सत्रात स्काऊट गाईड चळवळीचे झंडागित, प्रार्थना, आरोळ्या, विविध मनोरंजक टाळ्या, कृतीयुक्त गिते, आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत माहीती, प्रथमोपचार, उपलब्ध साहित्यापासून स्ट्रेचर बनविणे, इ. विषयाचे प्रात्यक्षिकांसह सविस्तर माहिती दिली. यात विद्यार्थ्यांनी सहभाग घेवून स्वतः अनुभव घेवून प्रशिक्षण घेतले.
शेवटच्या सत्रात प्रशिक्षक गोपाल काकड स्काऊट मास्तर, बाबासाहेब धाबेकर विद्यालय, यावर्डी यांनी स्काऊट गाईड ची विविध गाणी, खेळ, स्काऊट गाईड अभ्यासक्रम, टाळ्या, जिल्हा मेळावा, खरी कमाई, विविध उपक्रम, यांबाबत मार्गदर्शन केले. सर्व विद्यार्थ्यांनी संपूर्ण प्रशिक्षणात उस्फूर्त सहभाग घेवून प्रशिक्षण पुर्ण केल्याबद्दल समारोपीय कार्यक्रमात उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना व सहभागी शिक्षकांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. उपस्थितांच्या संपूर्ण नोंदणीचे कामकरीता जिल्हा कार्यालयातील घुगे व सिरसाट यांनी परिश्रम घेतले. असे वृत्त मुख्याध्यापक विजय भड यांचेकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्राप्त झाल्याचे संजय कडोळे यांनी कळवीले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....