गुरुकुंज मोझरी : संपूर्ण जगताला मानवतेची आणि सर्वधर्म समभावाची शिकवण देणाऱ्या सर्वार्थाने मानवतेचे व्यासपिठ असणाऱ्या गुरुकुंज मोझरी येथील सेवाकार्य हातामध्ये घेवून निःस्वार्थ सेवा देणाऱ्या श्री गुरुदेव प्रेमींचा दरवर्षी गुरुकुंज मोझरी येथील श्री गुरुदेव सेवा मंडळा कडून कार्यकर्ता संमेलनात पुरस्कार प्रदान करण्यात येतात. त्या परंपरेने यंदा कारंजा येथील सेवाधारी रामबकस डेंडूळे,सौ. छायाताई गजानन गावंडे,श्री गुरु महिला जिल्हा सेवाधारी ज्योती दिपकराव उगले आदींचा सत्कार करण्यात आला. या संदर्भात अधिक वृत्त असे की, सोमवार दि. 21 ऑक्टोंबर रोजी संमेलानाध्यक्ष सौ पुष्पाताई गावंडे मार्गदर्शक लक्ष्मणरावजी गमे, सरचिटणिस जनार्धनजी बोथे, उपसवाधिकारी दामोदरजी पाटील, श्री गुरुदेव सेवाश्रम ग्रामनाथ भवन शांतीनगर कारंजाचे सुनिलभाऊ दशमुखे आदींच्या उपस्थितीत श्री गुरुदेव सेवा मंडळ कारंजाचे सेवाधारी तथा भजन कलावंत रामबकस डेंडूळे, सौ.छायाताई गावंडे, सौ ज्योती उगले आदींचा शाल, श्रीफळ, पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी कारंजा येथील शेकडो गुरुदेव प्रेमी सद्भक्तांसह विजय बाबुराव खंडार, लोमेश पाटील चौधरी, संतोषराव केळकर, प्रदिप वानखडे इत्यादी उपस्थित होते .