कारंजा (लाड) : वाशिम-मंगरूळपिर विधानसभा मतदार संघ आणि कारंजा-मानोरा विधानसभा उमेद्वार म्हणून नक्की कोण ठरणार ? याचा महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषद आणि करंजमहात्म्य परिवाराच्या वतीने नुकताच आढावा घेण्यात आलेला असतांना,महायुतीच्या राजकीय पक्षांकडून जिल्ह्यातील वाशिम मंगरुळपिर मतदार संघाची उमेद्वारी पुन्हा एकदा आमदार लखन मलिक यांना तर कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाची उमेद्वारी, जिल्ह्यात भाजपा बळकट करणाऱ्या दिवंगत आमदार स्व. राजेंद्र पाटणी यांचे पुत्र ॲड. ज्ञायक पाटणी यांच्याच नावाला पसंती असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.तर महाविकास आघाडी कडून वाशिम मंगरुळपिर विधानसभा मतदार संघाची उमेद्वारी डॉ. सिद्धार्थ देवळे यांना तर कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाची उमेद्वारी सुनिल पाटील धाबेकर यांनाच राजकिय पक्षाकडून मिळण्याचे संकेत मिळत आहेत.त्याचप्रमाणे निवडणूकीत ज्या पक्षाचे जेथे आमदार त्याच पक्षाला उमेद्वारी हे धोरण महायुतीने अवलंबीले असल्यामुळे,वाशिम मंगरूळपिर मतदार संघात भाजपाला आणि आमदार लखन मलिक यांनाच उमेद्वारी तर कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघात भाजपाचे युवानेते आमदार पुत्र ॲड.ज्ञायक पाटणी यांनाच पक्षाकडून उमेद्वारी मिळणार असल्याचे महायुतीच्या गोटातील वृत्त आहे.या दोघांच्या नावाला देवेन्द्र फडणवीस यांच्या वरदहस्तामुळे महायुतीतील इतर घटक पक्षाकडूनही पाठींबा मिळण्याचे संकेत आहेत.तर महाविकास आघाडीमध्ये वाशिम मंगरूळपिर मतदार संघ काँग्रेसच्या वाट्याला येणार असून अर्थातच तेथील उमेद्वारी डॉ. सिद्धार्थ देवळे यांनाच मिळणार आहे.तर कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघ उबाठा गटाच्या वाट्याला किंवा अचानक शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षाला सुटू शकतो.व काही जरी झाले तरी महाविकास आघाडीचे उमेद्वार म्हणून आमदार पुत्र व सहकार नेते सुनिल पाटील धाबेकर यांच्या नावावर महाविकास आघाडी कडून शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे.सुनिल पाटील धाबेकर हे काँग्रेसचे नेते आहेत. सहकार नेते म्हणूनही त्यांची चांगलीच ओळख आहे.शिवाय ते धार्मिक,आध्यात्मीक आणि सामाजिक वृत्तीचे मनमिळाऊ नेते असून, अलिकडे त्यांनी कारंजा मानोरा मतदार संघाची निवड कर्मभूमी म्हणून केल्यामुळे त्यांचा मतदार संघातील ग्रामिण व शहरी भागात सततचा जनसंपर्क आहे. शरद पवार यांच्या कुटुंबाशी देखील ते निगडीत आहेत.रोहित पवार यांचेशी देखील त्यांचे जवळचे संबंध आहेत.तसेच शिवसेनेच्या मंत्रिमंडळात त्यांचे वडील आणि कारंजा विधानसभा मतदार संघाचे आमदार स्व. बाबासाहेब धाबेकर हे मंत्री होते. त्याचाही लाभ उमेद्वारी मिळविण्यासाठी सुनिल पाटील धाबेकर यांना मिळण्याची शक्यता आहे.आम्ही या संदर्भात कारंजा व मानोरा तालुक्यातील मतदारांचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता,महायुती आणि भाजपाला मानणाऱ्या मतदारांकडून ॲड ज्ञायक राजेंद्र पाटणी यांच्या उमेद्वारीला पहिल्या क्रमांकाची पसंती मिळत आहे. त्याचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता,मतदाराचे म्हणणे पडले की, "जी व्यक्ती एवढ्या कमी वयात मतदार संघासाठी अहोरात्र तनमनधनाने तडफडून कामे करत आहे. स्वतःच्या पैशाने मतदार संघातील रस्त्याचे निर्माण,मतदार संघाच्या कामासाठी वरिष्ठ मंत्र्यांच्या भेटीगाठी घेऊन स्व.राजेंद्र पाटणी यांनी नियोजिलेली कामे पूर्णत्वास नेत आहे.अशा व्यक्तीला जर एकदा संधी दिली तर नक्कीच त्या संधीचे सोने ही व्यक्ती करू शकते." तसेच सुनिल पाटील धाबेकर यांच्या बाबतीत महाविकास आघाडीच्या मतदाराचा कौल जाणून घेतला असता,आजही मतदार संघातच नव्हे तर संपूर्ण वाशिम जिल्ह्यात स्व. बाबासाहेब धाबेकर यांना माणणारा फार मोठा मित्रपरिवार असून,त्यांचा घाटोळे पाटील समाजही येथे मोठ्या प्रमाणात आहे.शिवाय इतर मराठा, ओबीसी,भटक्या विमुक्त,मुस्लीम, गवळी समाज बहुसंख्येने सुनिल पाटील धाबेकर यांचेसोबत आहे. शिवाय महाविकास आघाडीची उमेद्वारी देतांना,नवनिर्वाचित खासदार संजय देशमुख यांचे मत विचारात घेतल्या जाणार आहे.उल्लेखनिय म्हणजे खा.संजय देशमुख यांना निवडून आणण्याकरीता,रखरखत्या उन्हाळ्यात सहकार नेते सुनिल पाटील धाबेकर यांनी जीवाचे रान केले होते.शिवाय नुकत्याच कारंजा येथे झालेल्या सत्कार समारंभात सत्कारमूर्ती खा. संजय देशमुख यांनी देखील, मानोरा व कारंजेकराच्या प्रेमामुळे मी निवडून आलो.ज्यांनी ज्यांनी माझेसाठी अपार कष्ट घेतले.त्यांचे विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने ऋण फेडण्याची संधी चालून आलेली असल्याचे उद्गार काढले होते.त्यामुळे निश्चितच सुनिल पाटील धाबेकर यांना उमेद्वारी मिळवून देण्यासाठी खा.संजय देशमुख यांचा पाठींबा राहणार असल्याचे देखील संकेत मिळत आहे.असो लवकरच भविष्यात कुणा कुणाला उमेद्वारी मिळणार ते जाहीर होणार आहे.मात्र आमच्या अहवालानुसार वाशीम मंगरूळपीर विधानसभा मतदार संघातील निवडणूक आमदार लखन मलिक आणि डॉ. सिद्धार्थ देवळे यांच्यात तर कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघातील निवडणूक ॲड.ज्ञायक पाटणी आणि सुनिल पाटील धाबेकर यांच्यात होण्याची शक्यता जास्त आहे.असे वृत्त मतदार संघाच्या आढाव्यावरून ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी कळवीले आहे.