सध्या गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण विदर्भासह महाराष्ट्राच्याही अनेक भागात कमिजास्त प्रमाणात पाऊस होत असल्याने, परमेश्वराकडे पावसा करीता आर्त प्रार्थना करीत असलेल्या बळीराजाची हाक ऐकून पर्जन्यराजाने पाऊस बरसवायला सुरुवात केली आहे. असेच म्हणावे लागेल. त्यामुळे अनेक दिवसाच्या उघाड वातावरणामुळे, पावसाकरीता आतुर झालेल्या शेत जमिनीची थोडीफार का होईना तहान भागत असल्याने, वापशाच्या उन्हामुळे माना टाकणाऱ्या सोयाबीन पिकांसह, भाजी फुले फळाच्या वेली,व इतर प्रकारच्या पिकांना,अक्षरशः जीवदान मिळून नवसंजिवनी मिळाली आहे.
सध्या कारंजा मानोरा विधान सभा परिक्षेत्रातील ग्राम रुई गोस्ता येथील हवामान अभ्यासक गोपाल गावंडे हे आपल्या हवामान अंदाजा बाबत सुप्रसिध्द झालेले असून,त्यांचेकडून व्यक्त झालेल अंदाज लक्षात घेऊन समाधान व्यक्त करीत असतात. तसेच या परिसरातील गावकरी व शेतकरी आपल्या कामाकाजाचे नियोजन ठरवीत असतात. शिवाय त्यांचे एक दोन नव्हे तर हजारो प्रशसंक त्यांना पावसाबाबत फोन संवादाद्वारे व संदेशाद्वारे सतत विचारपूस करीत असतात.गेले अनेक दिवस पंचक्रोशीतील बहुतांश भागात पावसाने खंड तर दिलाच होता. त्याशिवाय उष्णता वाढल्यामुळे चाकरमान्यांच्या तर घामाच्या धारा वाहत होता. ह्या कारणाने शेतकरी राजा पावसा करीता चिंतातुर झालेला होता. परंतु दोनच दिवसांपूर्वी, आपले लाडके हवामान अभ्यासक गोपाल विश्वनाथ गावंडे यांनी दि. 5 सप्टेंबर ते दि 20 सप्टेंबरच्या दरम्यान पूर्व विदर्भात भंडारा, गडचिरोली,वर्धा,नागपूर तसेच पश्चिम विदर्भात यवतमाळ, अमरावती,अकोला,बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस होणार असल्याचे म्हटले असून,यापैकी काही भागात हा पाऊस भाग बदलवीत पडणार असून, कोठे कोठे विजांच्या लखलखाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस होणार असल्याचे म्हटले आहे. काही भागात तर जमिनिवर विजा पडणार असून नदी नाल्यांना पूर सुद्धा येण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.गेल्या दोन तिन दिवसां पासून पाऊस पडत असल्याने शेत पिकांना संजीवनी मिळून श्रावणाचा बहर आल्यामुळे हवामान अभ्यासक गोपाल गावंडे यांचे अंदाज अचूक ठरल्याची सर्वत्र प्रशंसाच होत असून,शेतकरी राजा त्यांचा गुणगौरव करीत आहे. खरोखरीच आम्ही त्यांचा अंदाज अनुभवल्यामुळे आम्ही सुद्धा त्यांचे अभिनंदन करीत असून, या पंधरवाड्यात पडणारा पाऊस वादळी वारा,ढगांचे गडगडाट, विजांचे कडकडाट घेऊन पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून सुद्धा व्यक्त होत असल्याने,कृपया ग्रामस्थ व शेतकरी बांधवानी सावध होऊन, पावसात झाडाचा आसरा घेऊ नये.नदी नाल्याच्या पूरातून वाहने काढू नये. शहरात मुख्य रस्त्यांवरील खड्ड्यांचा अंदाज घेऊन आणि रस्त्याच्या कडेला असणाऱ्या सांडपाण्याच्या गटारीचा अंदाज घेऊनच पायी चालावे.व आपल्या दुचाक्या चालवाव्यात असे आवाहन जनहितार्थ करण्यात येत आहे.