धान्य कापणीच्या कामाला वेग आलेला असल्याने धानाच्या कडपा जमा करण्यासाठी शिधीची गरज पडते त्याकरिता रामाळा (आरमोरी)येथील आनंदराव दुधबळे हे आपल्या सहकाऱ्यासोबत सकाळी 8 वाजता वैरागड रोडवर कूप क्र.41 येथे शिंद तोडत असताना वाघाने हल्ला करून दुधबळे यांचा जीव घेतला.
त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा व तीन मुली असा मोठा आप्त परिवार आहे
वरील घटनेमुळे रामाला परीसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना धानाची कापणी, मळणी कशी करावी हा यक्ष प्रश्न उपस्थित झाला आहे.