नागभीड:-- नागभीड नगरपरिषद क्षेत्रातील बोठली येथील जि. प. शाळेच्या इमारतीची दैनावस्था झाल्याने यावर्षी विद्यार्थ्यांना कुठे बसवावे असा गंभीर प्रश्न येथील पालक शिक्षकांपुढे उभा ठाकला आहे. शाळेची इमारत चाळीस वर्षे जुनी आहे. सण 1983 मध्ये दोन खोलीची इमारत बांधली असल्याची नोंद आहे. दीर्घ कालावधी झाल्यामुळे सदर इमारत वापरण्यास अयोग्य आहे. इमारतीला ठीक ठिकाणी भेगा पडल्या, छताचे प्लास्टर गळून पडले. त्यामुळे पावसाचे पाणी थेट वर्ग खोल्यांमध्ये जमा होते शाळेतील साहित्याची नासधूस, विद्यार्थ्यांची दप्तर ओले होणे अशा असंख्य अडचणी निर्माण झाल्या आहे. शौचालयाची व्यवस्था नाही, पिण्याच्या पाण्याची सोय नाही, गेल्या तीन वर्षापासून इमारत निर्लेलेखनाचा प्रस्ताव जीपमध्ये धूळ खात पडला आहे. सुविधा पुरविणे संदर्भाने जि प व न प दोन्ही विभाग जबाबदारी एक दुसऱ्यावर ढकलत आहे. सध्या या शाळेत मुख्याध्यापक श्री आनंद वाघे हे दरवर्षी लोकवर्गणीतून ताडपत्री विकत घेऊन शाळेचे छत झाकून घेतात व पावसाचे पाणी गळणार नाही यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र दरवर्षी सुमारे रुपये 20000 खर्च लोकवर्गणीतून करणे शक्य होणारे नाही. हे गाव नागभीड नगर परिषद क्षेत्रात गेल्यामुळे गेल्या सहा वर्षापासून शाळेसाठी मूलभूत सोयी सुविधा पुरविणे बंद झाले आहे. जि. प. यांच्या जबाबदारी झटकण्याचे प्रवृत्तीने शिक्षणाचे पवित्र ढासळत आहे तरीसुद्धा जि प व नपच्या अधिकारी व पदाधिकारी पदाधिकारी यांना काही सोयरसुतक दिसत नाही. शाळेची इमारत दुरुस्ती, छतावर ताडपत्री टाकण्यासाठी जी प वन न प कडे पैसा नाही का ?? असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांचे पालक व नागरिकांकडून विचारला जात आहे. शाळेत सोयीसुविधा व्हाव्यात यासाठी शिक्षकांना अतोनात त्रास होतो आहे. प्रशासनाकडे सारख्या हेलपाट्या घालाव्या लागत आहे मात्र तोडगा अजूनही सुटलेला नाही. या शाळेत दरवर्षी 40 ते 50 विद्यार्थी पटसंख्या असते किमान या विद्यार्थ्यांचा व त्यांचे शिक्षणाचा तरी विचार करावा आणि शाळेत सोयी सुविधा न प किंवा जि प पैकी कोणता विभाग करणार हे ठरविणे संदर्भात प्रशासनाने दखल घेऊन तात्काळ निर्णय घ्यावा व तोडगा काढावा अशी पालक व नागरिकांची मागणी आहे.