कमलापूर आणि पातानील येथील हत्ती गुजरात येथील जामनगर येथील खासगी एलिफंट पार्कला हलविण्याच्या विरोधात आज शुक्रवारी सकाळीं भारतीय जनता पार्टी तर्फे आलापल्ली येथील शहीद अजय मास्टे चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आला. यावेळी भाजपा च्या कार्यकर्त्याच्या वतीने तब्बल दोन तास वाहतूक रोखून धरल्याने दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी अहेरीचे तहसीलदार ओंकार ओतारी यांनी स्वतः आंदोलनस्थळी येऊन निवेदन स्वीकारले. त्यानंतर भाजपा कार्यकत्यांनी आलापल्ली येथील वनविभागाच्या वनसंपदा कार्यालयासमोर ठिया आंदोलनही केले.
निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील एकमेव शासकीय हत्ती कॅम्प म्हणुन ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील कमलापुर तथा पातानिल येथिल हत्ती त्यांच्या नैसर्गिक वास्तव्याच्या ठिकाणा वरून हजारो किलो मीटर दुर गुजरातला पाठविण्याचे काम आहे तरी सदर हत्ती हलविण्याचे राज्य शासनाचा निर्णय तत्काळ रद्द करावा हत्ती मुळे कमलापूर परिसरातील पर्यटन वाढले पर्यायाने रोजगार सुद्धा वाढले आहे सर्व हत्ती नैसर्गिक अधिवासात असून सुदृढ देखील आहेत कमलापूर जंगल परिसरातील रान म्हशी जावळ सुद्धा आहे येथील जंगल परिसरात नैसर्गिक वातावरणात वन्यप्राण्यांसाठी पोषक वातावरण आहे त्यामुळे येथिल हत्ती गुजरात सारख्या उष्ण भागात हलविणे चुकीचे आहे.
त्यामुळे हत्तींच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो त्याचबरोबर कमलापूर परिसरातील लोकांना रोजगार पासून मुकावे लागेल. त्याकरता हत्तींची इथेच सुविधा वाढवून देखभालीसाठी प्रशिक्षित कर्मचारी नेमून त्यांना सरंक्षण देण्यात यावे.हत्ती हलविण्याच्या प्रयत्न झाला तर आंदोलन पुन्हा तीव्र करण्याचा इशाराही निवेदनातुन देण्यात आला आहे. भाजप तालुकाध्यक्ष रवी नेलकुद्री यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात भाजपचे जिल्हा महासचीव रवीभाऊ ओल्लालवार,जेष्ठ नेते प्रकाश गुडेल्लीवार,तालुका महामंत्री संतोष मद्दीवार,मुकेश नामेवार व रमेश समुद्रालवार,अमोल गुडेल्लीवार,सुकमल मंडल इत्यादी पदाधिकार्यांसह शेकडो कार्यकर्ते ऊपस्थित होते.