कारंजा (लाड) : कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघातील उमेदवार तथा लोकप्रिय सहकार नेते,लोकनेते सुनिल बाबासाहेब धाबेकर यांच्या प्रचारार्थ,वंचित बहुजन आघाडीचे श्रध्देय बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांच्या विराट अशा जाहीर प्रचार सभेचे आयोजन वंचित बहुजन आघाडी आणि श्री सुनिल पाटील धाबेकर मित्र मंडळातर्फे दि ११ नोहेंबर २०२४ रोजी दुपारी ०१:०० वाजता,कारंजा येथील रेस्ट हाऊस मागे असणाऱ्या,अमर पिच क्रिडा मैदान मानोरा रोड येथे करण्यात आलेले असून त्यासाठी भव्य अशा मंडपाची आणि व्यासपिठाची उभारणी करण्यात आलेली आहे. आंबेडकरी जनतेमध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू असलेल्या श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांच्या शब्दाला फारच महत्व असून, जाहीर सभेमध्ये ते कोणता आदेश देतात.याकडे कारंजा मानोरा विधान सभा मतदार संघातील जनतेचे लक्ष्य लागले आहे.या संदर्भात अधिक वृत्त असे की,कारंजा मानोरा मतदार संघामध्ये,जनतेच्या सुखदुःखात त्यांच्या हाकेला ओ देणारे कर्तव्यतत्पर,विश्वासू आणि चारित्र्यवान असलेले तसेच सहकार क्षेत्राशी निगडीत असलेले मराठा समाजाचे सुनिल बाबासाहेब धाबेकर यांच्या सारखे तगडे उमेदवार मिळाल्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या आशा प्रफुल्लीत झालेल्या आहेत.सध्या कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्ही पक्षांनी कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघातील जनतेचा भ्रमनिराश केल्याचे चित्र दिसून येत असल्याने नागरीक मतदार निवडणूकीबाबत संभ्रमात होते.अशातच माजी मंत्री स्व.बाबासाहेब धाबेकर यांचे चिरंजीव सुनिल पाटील धाबेकर यांना महाविकास आघाडीकडून ऐनवेळी उमेदवारी पासून वंचित ठेवल्यामुळे मराठा समाजा मध्ये आणि सुनिल पाटील धाबेकर मित्रमंडळा मध्ये तिव्र नाराजी पसरली होती व सुनिल भाऊ धाबेकर यांच्या चाहत्यांनी त्यांना अपक्ष निवडणूक लढवावी.
यंदाच्या ह्या निवडणूकीमध्ये सन १९९४ मध्ये झालेल्या, योजनामहर्षी स्व.बाबासाहेब धाबेकर यांच्या नारळाचे झाड या चिन्हाच्या निवडणूकीची पुनरावृत्ती होणार अशी भविष्यवाणी देखील केली होती. तसेच मंत्रालय व अधिकारी वर्गाकडून सर्वसामान्य जनतेची कामे करण्यास सक्षम असणारा आपल्या सारख्या खंबीर व्यक्तीचे नेतृत्व आम्हाला हवे असल्याचे सांगीतले होते. त्यामुळे अखेर जनतेच्या आग्रहास्तव सुनिल पाटील यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला.असे असतांना श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांनी सुनिल पाटील धाबेकर यांना वंचित बहुजन आघाडीची उमेद्वारी देवून भक्कम आधार दिला.त्यामुळे मतदार संघात सर्वधर्म समभावाचे वेगळे समिकरण तयार होऊन सुनिल पाटील धाबेकर यांचा विजय सुनिश्चित झाला असून जनतेमधून मिळणाऱ्या प्रतिसादामुळे ते विजयाच्या जवळ पोहचले असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघात स्व.बाबासाहेब धाबेकर यांनी येथील आमदार तथा राज्यमंत्री असतांना,विकासाची अनेक कामे पूर्ण केली असल्यामुळे आणि विशेषतः मतदार संघातील सर्वच जातीधर्मातील गरजू गोरगरीब मध्यमवर्गीय लोकांना न्याय मिळवून दिला असल्यामुळे कारंजा मानोरा मतदार संघात फार मोठ्या प्रमाणात त्यांचा चाहता वर्ग व मित्रमंडळी आजही आहेत.त्यामुळे सुनिल पाटील धाबेकर यांच्या मागे जनता एकनिष्ठ पणाने ऊभी आहे.व त्यांच्या विजयाची सर्वांना खात्री आहे.त्यांच्या विजयाकरीता मतदार संघातील जनता उत्स्फूर्तपणे प्रचाराला लागलेली असून,सोमवार दि. ११नोहेंबर २०२४ रोजी,मानोरा मार्गावरील रेस्ट हाऊस मागे अमरपिच क्रिकेट मैदानावर श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांच्या विराट अशा प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले असून मतदार संघातील जनतेने बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष,शहराध्यक्ष व सर्वच कार्यकर्त्यांकडून करण्यात आले असून श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांचे जाहीर भाषण ऐकण्यासाठी कारंजा मानोरा तालुक्यातून विराट असा जनसागर उसळणार असल्याची जनतेमध्ये चर्चा असल्याचे वृत्त आहे.