मतदान जनजागृतीच्या रोबोट सोबत मतदारांनी काढली सेल्फी....
कारंजा:-
यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकांमध्ये मतदारांची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक आयोगाने प्रयत्न केले आहेत. 85 वर्षावरील व दिव्यांग मतदारांचे घरोघरी जाऊन मतपत्रिकेद्वारे मतदान,गावात दवंडी देणे,पथनाट्य सादर करून लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे,मतदान केंद्रावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था,सावलीची व्यवस्था,मतदान करणे का महत्त्वाचे आहे हे वेळोवेळी सोशल मीडिया द्वारे सांगणे, विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या चित्रकला व रांगोळी स्पर्धा असे अनेक उपक्रम निवडणूक आयोगाने हाती घेतले आहे.अनेक योजना यासाठी आखल्या आहेत. वाशिम जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात मतदानासंदर्भात जनजागृती करण्यात आली.वाशिमच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी बुवनेश्वरी एस.,सहायक निवडणूक अधिकारी कैलास देवरे,जिल्हा स्वीप नोडल अधिकारी गजानन डाबेराव,कारंजाचे तहसीलदार कुणाल झाल्टे,तालुका स्वीप नोडल अधिकारी श्रीकांत माने यांच्या मार्गदर्शनात मानवी रोबोट द्वारे येणाऱ्या मतदारांचे स्वागत गोपाल खाडे व रवी घाटे यांनी केले.या मानवी रोबोट सोबत सेल्फी सुद्धा मतदारांनी काढल्या.या रोबोटची भन्नाट कल्पना जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव चे शिक्षक तथा क्षेत्रीय अधिकाऱ्याचे धनज सर्कलचे पर्यवेक्षक गोपाल खाडे यांची आहे.अभिनव उपक्रमामुळे उन्हात आलेल्या मतदारांना मतदान करणे सुकर झाले. खाडे यांनी मानवी रोबोट साकारून त्यावर युवा मतदार हाच देशाचा आधार, आपल्या मताचे दान लोकशाहीची शान,मतं आपले द्यायचे आहे कर्तव्य बजावयाचे आहे,तोच देश होईन महान.. ज्या देशात १००% मतदान,असे जनजागृती पर संदेश त्यांनी यावेळी दिले. जि.प.शाळा काळी कारंजा व पंचायत समिती कारंजा अशा चार केंद्रावर रखरखत्या उन्हातही मतदारांनी गर्दी केली होती. तेथे गोपाल खाडे यांनी साकारलेला मानवी रोबोट पोहोचला आणि मतदारांच्या चेहऱ्यावर एकच हास्य फुलले. मतदारांसोबत आलेले त्यांची लहान मुले ही या रोबोट कडे आश्चर्य मिश्रित नजरेने पाहत होती. असे वृत्त आमचे जिल्हा प्रतिनिधी तथा महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी कळवीले आहे.