देसाईगंज :-
तालुक्यातील पञकारांची दि. 9 जुलै 2023 ला "व्हाईस ऑफ मिडीया"चे जिल्हाध्यक्ष व्यंकटेश दूडमवार, जिल्हा सरचिटणीस कैलास शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली जेष्ठ पत्रकार शामराव बारई यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत तालुका कार्यकारिणी घोषित करण्यात आली.
यात मार्गदर्शक शामराव बारई, अध्यक्ष विलास ढोरे, कार्याध्यक्ष महेश सचदेव, संघटक/कार्यवाह राजरतन मेश्राम, उपाध्यक्ष प्रा. दिलीप कहुरके, रवींद्र कुथे, सरचिटणीस प्रा. दयाराम फटिंग, सह सरचिटणीस शैलेश पोटवार, कोषाध्यक्ष राहुल मेश्राम, कार्यवाहक पंकज चहांदे, सदस्य घनश्याम कोकोडे, इलियास पठाण, विष्णू दूनेदार, अतुल बुराडे, प्रियंका ठाकरे, प्रकाश जिवाणी इत्यादीची पदाधिकारी म्हणून कार्यकारिणी घोषित करण्यात आली.
देशभरात पञकारांसाठी अनेक संघटना कार्यरत आहेत.त्यापैकी "व्हाईस ऑफ मिडीया"संघटनेने पञकारांच्या कल्याणासाठी पञकारांचा जिवन विमा , निवासासाठी घरे, सेवानिवृत्ती योजना, पाल्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य, नवे तंत्रज्ञान शिकवणी या सारख्या पंचसूत्री कार्यक्रम राबविण्यासाठी आश्वासक पाऊल उचलले आहे.
व्हाईस ऑफ मिडीया या पञकार संघटनेची देशभरातील व्याप्ती आणि संघटनेनी मांडलेल्या पंचसूत्री कार्यक्रम हे पञकारांसाठी कल्याणकारी असुन पञकारांनी संघटनेत सहभागी होवून सदस्य व्हावे, असे आवाहन या कार्यकरीणी च्या वतीने करण्यात आले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....