कृषी उत्पन्न बाजार समिती ब्रम्हपुरी तालुक्याची 2023 निवडणूक जाहीर झाली. या निवडणुकीच्या अनुषंगाने बाजार समितीच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांना यामुळे आनंद झाला. मात्र अगोदरच्या अनेक पंचवार्षिक मध्ये काही विशिष्ठ सत्ताधारी पक्ष्यांच्या पॅनलच्या प्रतिनिधींनी आपले वर्चस्व या संचालक मंडळाच्या समितीवर निर्माण करुन शेतकऱ्यांचे वेगवेगळ्या माध्यमातून शोषण केले व त्यांच्या समस्यांचे निराकरण केले गेले नाही,नुसतेच व्यापारी हिताचे काम करण्यात आले असल्याची खंत शेतकऱ्यानं मध्ये निर्माण झाली आहे.याला वचक बसावा म्हणून आता या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत तिसरा पर्याय आणि शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न सोडविण्याच्या हक्कापोटी शेतकरी परिवर्तन पॅनल अतिशय ताकदीने हि निवडणूक लढण्यास सक्षम आहे. यासाठी आज दिनांक 1-4-2023 ला मा. डॉ प्रेमलाल मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली सावित्रीबाई फुले विध्यालयाजवळ शोभा मिटिंग हॉल मध्ये नियोजन बैठक घेण्यात आली. यामध्ये विविध पक्ष संघटना यांच्या सहकार्याने शिक्कामोर्तब करण्यात आले आणि सर्वच्या सर्व जागा लढण्याची तयारी करण्यात आली आणि पुर्ण जागा निवडुन आणण्याची जबाबदारी सर्वांनी घेतली. या पॅनल साठी ज्या उमेदवारांना उमेदवारी पाहिजे असल्यास त्यांनी पॅनलच्या सर्व संघटनांच्या पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे डॉ प्रेमलाल मेश्राम, लिलाधर वंजारी, सुखदेव प्रधान,भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते विनोद झोडगे, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अमृत नखाते, मिलिंद भनारे, केवळराम पारधी सरपंच,रामेश्वर राकडे उप तालुका प्रमुख,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष वासु सोंदरकर, BRSP विधान सभा अधक्ष रोशन मेंढे, संभाजी ब्रिगेडचे मोंटू पिलारे, खोरीपाचे जीवन बागडे, गवई गटाचे तालुका अधक्ष विजय रामटेके , अनिल कांबळे पत्रकारआदि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.